Commendable! Pune Police saves life of a man who was being swept away in Mula-Mutha river
पुणे : राज्यामध्ये मान्सून पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. यापूर्वी राज्यात तुफान अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य जनतेचे मोठे नुकसान देखील झाले होते. यानंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा तुफान बॅंटिंग करण्यास सुरुवात केली आहे. तुफान पावसामुळे दुर्घटना देखील घडत आहेत. पुण्यात एक व्यक्ती मोटारसायकलसह बंधाऱ्यात वाहून जाताना पोलिसांनी त्याला वाचवले आहे. नवाज खुर्शीद कोतवाल (वय 38 वर्ष रा. तुकाराम नगर, चंदन नगर पुणे) असे प्राण वाचवण्यात आलेल्याचे नाव आहे.
हेही वाचा : Pune Monsoon Update: पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल पाण्याखाली; खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढवला
मुळा मुठा नदीवरील पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याची माहिती खराडी पोलीस ठाण्यास मिळाली असता, पोलीस मुळा मुठा नदीवरील बंधाऱ्यावरील पुलावरील रस्ता बंद करण्यासाठी गेले, तेथे एक जण मोटरसायकलसह बंधाऱ्यावर मध्यभागी अडकल्याचे दिसून आले. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी फायर ब्रिगेडला तात्काळ कळविले, परंतु पाण्याचा प्रवाह वाढत होता तो पाण्यात वाहून जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : भोर तालुक्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी; पेरणी केलेल्या शेतातच पाणी
त्यामुळे सहाय्यक पोलीस निरिक्षक खांडेकर, पोलीस अंमलदार दोरगे, पोलिस हवालदार सय्यद, पोलिस अंमलदार गायकवाड, महिला पोलीस अंमलदार थोरात, महिला पोलीस अंमलदार मालवंडे, पोलीस अंमलदार साळके , पोलिस अंमलदार काळे यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता दोरीच्या साह्याने मानवी साखळी बनवून अडकलेल्या व्यक्तीला सुरक्षितरित्या बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले. तसेच सदरचा रस्ता बॅरिकेट लावून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.