यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस
भोर : भोर तालुक्यात अवकाळी पावसाच्या विश्रांतीनंतर खरीप हंगामातील रखडलेल्या मशागतीच्या कामाला सुरुवात करुन खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला लगबग करत शेतकऱ्यांनी दोन ते तीन दिवसात बहुतांश पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने सलग पाच ते सहा दिवसांपासून जोरदार सुरुवात केली आहे. परिणामी, पेरणी केलेल्या शेतात पाणी साचले, भात तरवे पाण्याखाली बुडाले तर मशागत केलेल्या जमिनीचा वाफसा गेला. त्यामुळे बहुतांश शेतजमीन पेरणीविना रखडल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
मागील आठवड्यात पेरणी केलेली पिके सध्या उगवण होऊन जोमात येऊ लागली आहेत. मात्र, उगवलेल्या पिकांमध्ये पाणी साचल्याने पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. एकीकडे मागील १५-२० दिवसांपूर्वी पाऊस थांबेना, म्हणून अडचणीत आलेला शेतकरी पावसाच्या विश्रांतीनंतर थोड्या फार प्रमाणात खरीप हंगामातील पेरणी केल्यानंतर सध्या पाऊस थांबेना म्हणून अडचणीत आल्याने हवालदिल झाला आहे.
हेदेखील वाचा : Ashadhi Wari 2025 : वरूणराजाने जोरदार सलामी देत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला दिली साद, होणार प्रस्थान
शेतकरी पाऊस थांबण्याच्या प्रतीक्षेत असला तरी पाऊस थांबत नसल्याने खरीपातील पिकांच्या पेरण्या होणार की नाही ? ,या द्विधा अवस्थेत आहे. पावसाने उघडीप दिली तर पुढील पाच ते सहा दिवसात उर्वरित खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, पाऊस थांबलाच नाही, तर कडधान्य पेरणी होणार नाही. परिणामी, बियाणे विकत घेण्याची परिस्थिती नसतानाही बहुतांश शेतकऱ्यांनी एकमेकांकडून उसने पिसे घेऊन विकतचे आणलेले कडधान्याचे बियाणे घरात पडून राहणार असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होणार आहे.