Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोणावळ्यातील सायकल रॅलीला प्रतिसाद; अभिनेते सिध्दार्थ जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

लोणावळा नगरपरिषदेचा वतीनं स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धा, जिंगल स्पर्धा, निबंध स्पर्धा, वॉल पेंटिंग, शॉर्ट मुव्ही आदी स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आली.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 30, 2021 | 05:55 PM
लोणावळ्यातील  सायकल रॅलीला प्रतिसाद; अभिनेते सिध्दार्थ जाधव यांच्या हस्ते उद्घाटन
Follow Us
Close
Follow Us:
  • प्लॉग ओ थॉन रनमध्ये स्वच्छता मोहीम

लोणावळा : पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळा शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी माझी वसुंधरा माझा अभिमान व स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२२अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने गुरुवारी सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ५०० हून अधिक नागरिक या उपक्रमात सायकली घेऊन सहभागी झाले होते. प्रसिद्ध सिनेअभिनेते सिध्दार्थ जाधव यांच्या हस्ते झेंडा दाखवत ह्या सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आल.

तिन गटात ही सायकल रॅली सोडण्यात आली. ह्यामध्ये लहान मुलाचा गट लोणावळा नगरपरिषद कार्यालय ते मावळा पुतळा, ठोंबरेवाडी, सिद्धार्थनगर व पुन्हा नगरपरिषद कार्यालय ह्या मार्गाने सोडण्यात आला. त्यानंतर महिला व मुलींचा गट नगरपरिषद कार्यालय ते मावळा पुतळा, पुढे रायवुड व भुशी धरण मार्गे आयएनएस शिवाजी गेट व पुन्हा नगरपरिषद कार्यालय तर पुरुष व युवकाचा गट नगरपरिषद कार्यालय ते मावळा पुतळा, कुमार चौक, मिनू गॅरेज मार्गे डॉन बॉस्को, तुंगार्ली, वलवण, नांगरगाव, भांगरवाडी मार्गे पुन्हा नगरपरिषद कार्यालय असा सोडण्यात आला.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे, स्वच्छता आणि आरोग्य सभापती रचना सिनकर , नगरसेवक श्रीधर पुजारी, सुधिर शिर्के, भाजपाचे गटनेते देविदास कडू, नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, मंदा सोनवणे, सुवर्णा अकोलकर, संध्या खंडेलवाल, ललित सिसोदिया, माजी नगरसेवक विशाल पाडाळे यांच्यासह लोणावळा सायकल क्लबचे सदस्य, शिवदुर्ग मित्र, लायन्स क्लब, लोणावळा शहर मराठी पत्रकार संघ, जेष्ठ नागरिक संघ आदी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

समारोपास अभिनेत्री आयेशा झुल्काची उपस्थिती

रॅलीच्या समारोप प्रसंगी सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री आणि लोणावळा शहराच्या ब्रँड अॅम्बेसिडर आयेशा झुल्का या उपस्थित होत्या. यावेळी लोणावळा नगरपरिषदेचा वतीनं स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धा, जिंगल स्पर्धा, निबंध स्पर्धा, वॉल पेंटिंग, शॉर्ट मुव्ही आदी स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आली. तद्नंतर लोणावळा नगरपरिषद ते ट्रायोज मॉल आणि परत लोणावळा नगरपरिषद या मार्गावर प्लॉग ओ थॉन रनचे आयोजन करण्यात आले होते. या रन मध्ये रस्त्याने धावताना रस्त्यावर पडलेला कचरा उचलून तो जमा करण्यात आला. सुमारे २०० विद्यार्थी आणि नागरिकांनी यात सहभाग घेतला होता.

Web Title: Response to lonavla cycle rally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2021 | 05:55 PM

Topics:  

  • Lonavla

संबंधित बातम्या

Lonavala Travel Guide: लोणावळ्याला कसं जायचं? राहण्या-खाण्याची सोय असते का? सविस्तर माहिती जाणून घेऊया
1

Lonavala Travel Guide: लोणावळ्याला कसं जायचं? राहण्या-खाण्याची सोय असते का? सविस्तर माहिती जाणून घेऊया

Lonavala Crime : लोणावळ्यात पर्यटकांवर हल्ला; बेदम मारहाण करुन एकाचा खून
2

Lonavala Crime : लोणावळ्यात पर्यटकांवर हल्ला; बेदम मारहाण करुन एकाचा खून

पाच पांडवांची श्रद्धा आणि दगडातून घडवले मंदिर, जाणून घ्या एकविरा देवीच्या मंदिराची कथा
3

पाच पांडवांची श्रद्धा आणि दगडातून घडवले मंदिर, जाणून घ्या एकविरा देवीच्या मंदिराची कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.