पुणे : चॅम्प्स स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित चॅम्प्स करंडक 12 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत ओजस शेंद्रे (नाबाद 58धावा व 3-15) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर सहारा क्रिकेट अकादमी संघाने व्हिबग्योर स्कूल बालेवाडी संघाचा 8 गडी राखून पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. सहारा क्रिकेट अकादमी संघाने सलग तीन विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला.
धायरी येथील सहारा क्रिकेट मैदानावर स्पर्धा
धायरी येथील सहारा क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रथम फलंदाजी करताना अर्जुन पवार 33, शौनक डी 18, रेयांश म्हसे 13, अर्णव नल्हे 13 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर व्हिबग्योर स्कूल बालेवाडी संघाने 25षटकात 9बाद 128धावा केल्या. सहारा क्रिकेट अकादमीकडून श्रेयस कुंभार(3-9), ओजस शेंद्रे(3-15), अद्वैय तरले(1-6), आयुध सूर्यवंशी(1-18)यांनी सुरेख गोलंदाजी केली.
हे आव्हान सहारा क्रिकेट अकादमी संघाने 16.3षटकात 2बाद 129धावा करून पूर्ण केले. यात ओजस शेंद्रेने 44चेंडूत 12चौकाराच्या मदतीने नाबाद 58धावा, गजानन तडवळकरने 35चेंडूत 6चौकारासह नाबाद 35 धावा काढून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.