Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुष्काळाच्या कक्षेबाहेर तरीही पावसाचा दुष्काळ; पाच तालुक्यांत टंचाईची चाहूल

जिल्ह्यात यंदा पावसाचे वितरण अत्यंत असमान राहिले आहे. काही भागांत समाधानकारक पाऊस झाला असला, तरी अनेक महसूल मंडळांमध्ये सलग पावसाचा अभाव राहिल्याने पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 01, 2026 | 11:40 AM
दुष्काळाच्या कक्षेबाहेर, तरीही पावसाचा दुष्काळ; पाच तालुक्यांत टंचाईची चाहूल

दुष्काळाच्या कक्षेबाहेर, तरीही पावसाचा दुष्काळ; पाच तालुक्यांत टंचाईची चाहूल

Follow Us
Follow Us:

पुणे : जिल्ह्यातील आठ तालुक्यांत दुष्काळाची घोषणा झाली असली, तरी दुष्काळाच्या यादीबाहेर असलेल्या तालुक्यांमध्येही पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. मुळशी, मावळ, हवेली, जुन्नर आणि आंबेगाव या पाच तालुक्यांतील ५३ महसूल मंडळांपैकी तब्बल ४३ मंडळांमध्ये २१ दिवस किंवा त्याहून अधिक काळ पावसाचा खंड नोंदला गेला आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त तालुक्यांबाहेरील ग्रामीण भागातही शेतीपिकांवर संकटाचे सावट निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात यंदा पावसाचे वितरण अत्यंत असमान राहिले आहे. काही भागांत समाधानकारक पाऊस झाला असला, तरी अनेक महसूल मंडळांमध्ये सलग पावसाचा अभाव राहिल्याने पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या भागातील खरीप पिकांना या खंडाचा फटका बसत आहे.

Maharashtra Live breaking News in Marathi : पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी

दरम्यान, मुळशी, मावळ, हवेली, जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यांमध्ये एकाच तालुक्यातील विविध महसूल मंडळांमध्ये पावसाच्या प्रमाणात मोठी तफावत दिसून येत आहे. काही मंडळांमध्ये दीर्घ खंड असताना अन्य भागांत तुलनेने पाऊस झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे केवळ तालुकानिहाय पर्जन्यमानाच्या सरासरीवरून परिस्थितीचे अचूक मूल्यमापन करणे कठीण ठरत आहे.

पावसातील खंड वाढल्याने जमिनीतील ओलावा कमी

पावसातील खंड वाढल्याने जमिनीतील ओलावा कमी होणे, पिकांची वाढ मंदावणे आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर नसलेल्या तालुक्यांतील बाधित महसूल मंडळांची स्वतंत्रपणे दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

पंचनाम्यांवर शेतकऱ्यांचे लक्ष

पावसाचा खंड, पिकांची सद्यस्थिती आणि प्रत्यक्ष शेतीतील नुकसान याचा आढावा घेऊन प्रशासनाने बाधित भागांची नोंद घेण्याची मागणी होत आहे. दुष्काळाच्या निकषांत न बसणाऱ्या, मात्र प्रत्यक्षात पावसाअभावी अडचणीत आलेल्या गावांनाही परिस्थितीनुसार मदत मिळणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दुष्काळाची सरकारी यादी वेगळी आणि प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती वेगळी, असे चित्र या पाच तालुक्यांतील अनेक महसूल मंडळांत निर्माण झाले असून, आगामी काळात पावसाचे पुनरागमन न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

Web Title: Signs of scarcity in five talukas in pune ka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 11:21 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.