Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विक्रम गायकवाड हत्येप्रकरणी एसआयटीची स्थापना; पोलीस अधीक्षकांची माहिती; रामदास आठवले घेणार पीडित कुटुंबियांची भेट

तसेच आजच जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडून सुमारे चार लाख 25 हजार रुपयांचा सहायता निधी पीडित मातेच्या नावावर वर्ग करण्यात आलेला आहे. केवळ पुनर्वसन नव्हे तर आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होणे आवश्यक आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 20, 2025 | 09:49 PM
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले घेणार पीडित कुटुंबियांची भेट

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले घेणार पीडित कुटुंबियांची भेट

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : भोर येथील विक्रम गायकवाड यांच्या आंतरजातीय विवाहातून झालेल्या हत्येनंतर आंबेडकरी चळवळीमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.18) भोर तहसील कार्यालयावर जवळपास हजारो लोकांच्या उपस्थितीत निषेध मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाद्वारे पोलीस अधीक्षक यांना सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने गुरुवारी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट घेतली.

यावेळी परशुराम वाडेकर, डॉ. सिद्धार्थ धेंडे, राहुल डंबाळे यांच्यासह प्रवीण ओव्हाळ, बाळासाहेब अडसूळ, नवनाथ गायकवाड इत्यादींच्या प्रतिनिधी मंडळांनी भेट घेतली असता सदर प्रकरणी राज्य सरकार व जिल्हा पोलीस प्रशासन गंभीर असून, आंदोलकांच्या मागणीनुसार याप्रकरणी आठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती शिष्टमंडळाला पोलिस अधीक्षकांनी दिली.

या प्रकरणात फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर कोणताही दबाव येऊ नये व त्यांना कोणतीही भीतीचे वातावरण वाटू नये यासाठी ॲट्रॉसिटी कायद्यातील तरतुदीनुसार फिर्यादीला व त्यांच्या कुटुंबीयांना 24 तास पोलीस संरक्षण पुरवण्याचे आदेश काढण्यात आल्याचे पंकज देशमुख यांनी सांगितले. तसेच आजच जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडून सुमारे चार लाख 25 हजार रुपयांचा सहायता निधी पीडित मातेच्या नावावर वर्ग करण्यात आलेला आहे. केवळ पुनर्वसन नव्हे तर आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होणे आवश्यक आहे.

तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही घटना होऊ नये यासाठी राज्य सरकारने विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन करण्यात येणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर यांनी सांगितले. यावेळी ते बोलताना म्हणाले की, 22 फेब्रुवारी रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे देखील पीडित कुटुंबीयांची भेट घेणार असून ते याप्रकरणी योग्य तो न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याशी देखील बोलणार आहेत.

अशा प्रकारच्या घटना समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी अत्यंत जबाबदारीने प्रकरणाला सामोरे जायला हवे व यातील आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्राथमिक तपास योग्य करण्यासाठी पोलिसांच्या सोबत काम केले पाहिजे अशी भूमिका डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मांडली.
दरम्यान, अलीकडच्या काळात वाढत असलेल्या ऑनर किलिंग च्या घटनांमुळे तरुणांमध्ये मोठी भीती व संतापाची भावना असून सरकारने ऑनर किलिंग विरोधी कायदा तात्काळ करावा अशी मागणी राहुल डंबाळे  यांनी केली.

Web Title: Sit formed after protest in vikram gaikwad murder case nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • Ramdas Athawale
  • SIT Enquiry

संबंधित बातम्या

Ramdas Athawale: ‘गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश’, विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेवर आठवलेंचा जोरदार आक्षेप; म्हणाले…
1

Ramdas Athawale: ‘गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश’, विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेवर आठवलेंचा जोरदार आक्षेप; म्हणाले…

Mahayuti: “भाजपकडून जागा न मिळाल्यास…”; आगामी निवडणुकीवरून आठवलेंचा महायुतीला इशारा
2

Mahayuti: “भाजपकडून जागा न मिळाल्यास…”; आगामी निवडणुकीवरून आठवलेंचा महायुतीला इशारा

Mahadeo Munde: मोठी बातमी! महादेव मुंडेच्या हत्येची SIT चौकशी होणार; CM फडणवीसांचे डीजीपींना आदेश
3

Mahadeo Munde: मोठी बातमी! महादेव मुंडेच्या हत्येची SIT चौकशी होणार; CM फडणवीसांचे डीजीपींना आदेश

Ramdas Athawale : …तर राज ठाकरे सर्वांना नोकऱ्या देणार का? राज ठाकरे यांच्या विधानावर रामदास आठवलेंची संतप्त प्रतिक्रिया
4

Ramdas Athawale : …तर राज ठाकरे सर्वांना नोकऱ्या देणार का? राज ठाकरे यांच्या विधानावर रामदास आठवलेंची संतप्त प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.