Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

स्वच्छतागृह आणि कचऱ्याची नियमित स्वच्छता न झाल्यास आपण स्वतः स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यासाठी झाडू हाती घेऊ, अशी तंबी उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी घनकचरा विभागाचे प्रमुख अविनाश सपकाळ यांना दिली. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 15, 2026 | 12:30 AM
...तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

...तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

Follow Us
Follow Us:
  • घनकचरा विभागाचा आंधळा कारभार सुरू
  • उपमहापौरांनी घनकचरा विभाग प्रमुखांना दिली तंबी
  • कारभारात त्वरित सुधारणा करण्याचे निर्देश
पुणे : पुणे शहरात घनकचरा विभागाचा आंधळा कारभार सुरू असून, स्वच्छतागृह आणि कचऱ्याची नियमित स्वच्छता न झाल्यास आपण स्वतः स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यासाठी झाडू हाती घेऊ, अशी तंबी उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी घनकचरा विभागाचे प्रमुख अविनाश सपकाळ यांना दिली. पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर चौथ्याच दिवशी वाडेकर यांनी सकाळी सहा वाजताच सपकाळ आणि क्षेत्रीय आयुक्त नायकर, मुख्य आरोग्य निरीक्षक इनामदार, आरोग्य निरीक्षक विनायक चोपडे, आरोग्य निरीक्षक प्रवीण दरेकर, मुकादम संतोष शेलार, सिद्धार्थ बागुल या अधिकाऱ्यांसह दोन – तीन आरोग्य कोठ्यांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

 

यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली असता खुद्द आरोग्य निरीक्षक अनुपस्थित असल्याचे आढळले. त्याचप्रमाणे 54 सफाई कर्मचाऱ्यांपैकी केवळ 23 कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. मागील हजेरीची पाहणी केली असता कागदावर 100 टक्के उपस्थिती लावल्याचे दिसून आले.

घनकचरा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे एकमेकात संगनमत होत असून, त्यांच्याकडून एकमेकांच्या चुकांवर पांघरून घालण्याचे काम केले जात असल्याचे दिसून आले आहे, त्यातील जे उशिरा आले त्यांच्यावर अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली. उर्वरित लोकांवरही कारवाई होणार असल्याचे वाडेकर यांनी नमूद केले.

आरोग्य हा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. विशेषतः झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना नरकसदृश परिस्थितीत राहावे लागत आहे. सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यांची नियमित स्वच्छता केली जात नाही. कचरा पेटीतील कचरा नियमितपणे उचलला जात नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : सर्वसाधारण सभेतील संकेतांचा सत्ताधाऱ्यांना विसर; विरोधी पक्षाच्या आक्षेपानंतर बिडकरांकडून दखल

यासंबंधी घनकचरा विभागातील प्रमुख सपकाळ हे स्वतः उपस्थित असल्यामुळे वस्तुस्थिती त्यांच्या नजरेसमोर आली आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. घनकचरा विभागाच्या कारभारात त्वरित सुधारणा करण्याचे निर्देश यांना देण्यात आले आहेत, असे परशुराम वाडेकर यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : पुणे महापालिकेच्या विविध समित्यांच्या सदस्याची नावे जाहीर; कोणाकोणाला मिळाली संधी?

Web Title: Pune deputy mayor parshuram wadekar has issued a warning to the heads of the solid waste department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Pune mahapalika
  • pune news
  • Ramdas Athawale

संबंधित बातम्या

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित
1

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे
2

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’
3

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार
4

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.