Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅस तुटवड्यामुळे छोटे व्यवसाय अडचणीत; आंतरराष्ट्रीय तणावाचा मावळ तालुक्याला फटका

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतात गॅस तुटवड्याच्या स्वरूपात दिसू लागला असून, त्याचा फटका थेट मावळ तालुक्यातील ग्रामीण भागाला बसत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 21, 2026 | 06:40 PM
गॅस तुटवड्यामुळे छोटे व्यवसाय अडचणीत; आंतरराष्ट्रीय तणावाचा मावळ तालुक्याला फटका

गॅस तुटवड्यामुळे छोटे व्यवसाय अडचणीत; आंतरराष्ट्रीय तणावाचा मावळ तालुक्याला फटका

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतात गॅस तुटवड्याच्या स्वरूपात दिसू लागला असून, त्याचा फटका थेट मावळ तालुक्यातील ग्रामीण भागाला बसत आहे. मुंबई–पुणे महामार्गालगत असलेल्या छोट्या चहाविक्रेत्यांपासून ते खाद्यपदार्थ विक्रेत्यांपर्यंत अनेक व्यवसायिकांना गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी तर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प असल्याने चायनीज फूड गाड्यांचे व्यवसाय पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. अनेक विक्रेत्यांकडे गॅसचा साठा संपल्यामुळे सूप, नूडल्ससह विविध स्ट्रीट फूड पदार्थ तयार करणे अशक्य झाले आहे. दरम्यान, आपल्या समस्या मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध नसल्याची खंत या छोट्या व्यावसायिकांनी व्यक्त केली असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. गॅस तुटवड्यामुळे केवळ व्यावसायिकांनाच नव्हे, तर ग्राहकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रोजच्या सवयीप्रमाणे चहा, नाश्ता किंवा फास्टफूड घेणाऱ्या नागरिकांना आता पर्याय शोधावे लागत आहेत. त्यामुळे छोट्या व्यवसायांबरोबरच स्थानिक अर्थचक्रावरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

लाकूड, कोळशाचा वापर करण्याचा प्रयत्न

अनेक विक्रेत्यांनी सांगितले की, गॅस वितरकांकडून वेळेवर सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना महागड्या दराने सिलेंडर मिळवावे लागत आहेत. काही ठिकाणी तर काळाबाजाराचाही संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या छोट्या व्यावसायिकांचे नुकसान अधिक वाढत आहे. यासोबतच, काही विक्रेत्यांनी पर्यायी उपाय म्हणून लाकूड किंवा कोळशाचा वापर करण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यातून धूर आणि पर्यावरणीय समस्याही निर्माण होत आहेत. तसेच या पद्धतीत वेळ आणि खर्च दोन्ही वाढत असल्याने तो उपायही फारसा उपयोगी ठरत नाही.

गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

स्थानिक व्यावसायिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. विशेषतः छोटे विक्रेते, हातगाडीधारक आणि फूड स्टॉल चालवणाऱ्यांसाठी स्वतंत्र पुरवठा यंत्रणा उभी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून याबाबत कोणती ठोस भूमिका किंवा उपाययोजना जाहीर करण्यात आलेली नसल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ही परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर अनेकांना आपला व्यवसाय बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Small businesses in maval taluka are in trouble due to gas shortage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • Gas Cylinder
  • LPG gas cylinder
  • maval news

संबंधित बातम्या

LPG Gas Cylinder: 30 जून नंतर मिळणार नाही सिलेंडर? काय आहे सरकारची नवी गाईडलाइन
1

LPG Gas Cylinder: 30 जून नंतर मिळणार नाही सिलेंडर? काय आहे सरकारची नवी गाईडलाइन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.