Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात पावसाची विश्रांती; उकाड्याने नागरिक पुन्हा हैराण, तापमानाचा पारा 31 अंशांवर

पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता कमी असून, तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. शहर आणि परिसरात मंगळवारी सकाळपासून आकाश अंशतः ढगाळ होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 30, 2026 | 12:19 PM
पुण्यात पावसाची विश्रांती; उकाड्याने नागरिक पुन्हा हैराण, तापमानाचा पारा 31 अंशांवर

पुण्यात पावसाची विश्रांती; उकाड्याने नागरिक पुन्हा हैराण, तापमानाचा पारा 31 अंशांवर

Follow Us
Follow Us:

पुणे : शहरात सोमवारी पावसाने हजेरी लावल्यानंतर मंगळवारी पुन्हा पावसाने विश्रांती घेतली. सकाळी अंशतः ढगाळ वातावरण होते; मात्र दुपारनंतर उन्हाचा चटका वाढल्याने उकाड्यातही वाढ झाली. शहरातील कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २०.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. त्यातच बुधवारी (दि.30) तापमानाचा पारा 31 अंशांवर पोहोचला असून, पुन्हा उकाडा जाणवत आहे.

पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता कमी असून, तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. शहर आणि परिसरात मंगळवारी सकाळपासून आकाश अंशतः ढगाळ होते. दुपारनंतर मात्र ढग दूर होत उन्हाचा चटका जाणवू लागला. पावसाने विश्रांती घेतल्याने वातावरणातील उकाडाही वाढला. पुढील काही दिवस पावसाची शक्यता कमी असल्याने कमाल तसेच किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता. ३०) सकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.

बुधवारी दुपारनंतर आणि सायंकाळी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून, शहराच्या काही भागांत हलक्या सरी पडू शकतात. या दिवशी कमाल तापमान ३३ अंश, तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. मात्र, सध्या पुण्यातील तापमानाचा पारा 31 अंशांवर गेल्याचे दिसून आले आहे.

गुरुवारी कसे असेल हवामान?

गुरुवारी (ता. १) आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असून, दुपारनंतर आणि सायंकाळी अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते. त्यानंतरही पावसाची शक्यता कमी राहणार असल्याने शहरात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ

पावसाळ्याचे दिवस असूनही पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यासह पातूर तालुक्यात सध्या तीव्र उन्हाच्या चटक्यासह असह्य उकाड्‌याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. आकाशात अधूनमधून ढग दाटून येत असले, तरी पाऊस पडण्याऐवजी उन्हाचा कडाका वाढत असल्याने सप्टेंबर महिन्यातच नागरिकांना ‘ऑक्टोबर हीट’ चा दाहक अनुभव येत आहे.

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…

Web Title: Temperature in pune hits 31 degrees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 12:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.