Pune Rain: पुण्यात पावसाचा जोर ओसरला; खडकवासल्यातून 'इतक्या' क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू
पुणे: पुणे जिल्हा आणि शहर परिसरात गेल्या दोन ते दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. टेमघर, पानशेत, वरसगाव धारण क्षेत्रत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून तब्बल २८ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरातून वाहत होती. मात्र आज दिवसभरात पुणे शहरात दिवसाचा जोर कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
खडकवासला धरण क्षेत्रात म्हणजेच टेमनगर, वरसगाव आणि पानशेत धरणात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. खडकवासला धरणातून करण्यात येणार २८ हजारांचा विसर्ग आता कमी करण्यात आला आहे. आता सध्या खडकवासला धरणातून १७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
गेले एक ते दोन दिवस पुणे जिल्ह्यात आणि शहर परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला होता. खडकवासल्यामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु होता. त्यामुळे मुठा नदी देखील दुथडी भरून वाहत होती.
मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला
गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात देखील पावसाचा जोर पाहायला मिळाला. मात्र अजूनही काही जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे पाहायला मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत होते. मात्र गेले दोंन ते तीन दिवस पावसाचे जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. गोंदिया, वाशीम, अकोला, अमरावती, नागपूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे.
खडकवासल्यातून मुठा नदीपात्रात विवसर्ग सुरु असल्याने उजनी धरणात पाणीसाठ्यात वाढ होत आहे. उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने उजनी धरणातून देखील भीमा नदीत १ लाख क्यूसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. चंद्रभागा नदी देखील दुथडी भरून वाहत आहे.
Pune News: पुणेकरांनो सावधान! खडकवासल्यातून २५ हजार क्यूसेकने विसर्ग, भिडे पूल पाण्याखाली तर…
चंद्रभागेचे वाळवंट पाण्याखाली गेले आहे. पंढपूरमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील काही भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात देखील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकण किनारपट्टीवर तर रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहेत. मराठवाडा, विदर्भात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. समुद्राला उधाण आले आहे.