Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Medha Kulkarni News: शहरी पुरावर ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ हाच उतारा! पुण्याच्या जलसुरक्षेसाठी मेधा कुलकर्णींचे केंद्राकडे साकडं

या पार्श्वभूमीवर सहकारी गृहनिर्माण संस्थांना खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी (एमपीएलएडी) अंतर्गत पावसाचे पाणी साठवण प्रकल्पांसाठी पात्र ठरवावे, अशी मागणी केली.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 15, 2026 | 04:50 PM
Pune Water Crisis 2026, Dr. Medha Kulkarni Rajya Sabha,

Pune Water Crisis 2026, Dr. Medha Kulkarni Rajya Sabha,

Follow Us
Follow Us:
  • खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत पुण्यासह राज्यातील शहरी जलसुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला.
  • वेगाने होणारे काँक्रीटीकरण आणि अनियंत्रित शहरीकरणामुळे जमिनीची पाणी शोषण्याची क्षमता कमी झाली आहे.
  • डॉ. कुलकर्णी यांनी गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत सवलत देण्याची मागणी केली.
Pune Politics : भूजल संवर्धनासाठी पुण्यासह राज्यात पावसाच्या पाणीसाठवणुकीची (रेनवॉटर हार्वेस्टिंग) व्यवस्था तातडीने प्रभावी व सक्षम करण्याची मागणी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी राज्यसभेत केली. शून्य प्रहरात डॉ. कुलकर्णी यांनी हा मुद्दा उपस्थित करीत हा विषय केवळ पर्यावरणापुरता मर्यादित नसून, शहरी जलसुरक्षा, पूरनियंत्रण आणि हवामान बदलाशी जुळवून घेण्यासंबंधित असल्याचे त्यांनी नमूद केले.

Ajit Pawar Plane crash New Video: अजित पवारांचा अपघात की घातपात? दुर्घटनेचा नवा ‘स्फोटक’ व्हिडिओ समोर

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “पुण्यासारख्या शहरात सरासरी पुरेसा पाऊस पडत असतानाही दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई आणि पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. यामागील मुख्य कारण म्हणजे पावसाचे पाणी वैज्ञानिक पद्धतीने साठवण आणि भूजल पुनर्भरण न होणे हे आहे. दाट वस्तीच्या भागांत मोठे साठवण टाके उभारण्यासाठी जागेचा अभाव, बांधकामाचा जास्त खर्च आणि तांत्रिक मार्गदर्शनाची कमतरता यामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्या ही प्रणाली राबवू शकत नाहीत. तसेच अनेक ठिकाणी बसवलेल्या प्रणाली मानकांनुसार नसल्याने जलप्रदूषणाचा धोका निर्माण होतो. योग्य गाळणी व नियमित देखभाल नसल्यास साठवलेले पाणी वापरायोग्य राहत नाही किंवा भूजल पुनर्भरणालाही उपयोगी पडत नाही.”

“अनियंत्रित शहरीकरण आणि वेगाने वाढणारे काँक्रीटीकरण यामुळे नैसर्गिक जलनिस्सारण मार्ग व मोकळी जमीन नष्ट होत असून, जमिनीची पाणी शोषण्याची क्षमता घटत आहे. परिणामी अल्प कालावधीत होणारा मुसळधार पाऊस थेट नाले व नद्यांत वाहून जातो, ज्यामुळे शहरी पूरस्थिती निर्माण होते; मात्र भूजलपातळीत सुधारणा होत नाही. हवामान बदलामुळे हलक्या, दीर्घकालीन पावसाऐवजी कमी वेळात अतिवृष्टीचे प्रमाण वाढत असल्याने ही समस्या अधिक तीव्र होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उप

या पार्श्वभूमीवर सहकारी गृहनिर्माण संस्थांना खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी (एमपीएलएडी) अंतर्गत पावसाचे पाणी साठवण प्रकल्पांसाठी पात्र ठरवावे, अशी मागणी केली. तसेच ज्या सोसायट्यांत कार्यक्षम प्रणाली बसविल्या आहेत, त्यांना मालमत्ता कर सवलत, पाणीपट्टीत सूट आदी आर्थिक प्रोत्साहने द्यावीत, जेणेकरून इतर संस्थाही या उपाययोजना स्वीकारतील. नवीन इमारती, व्यापारी संकुले व मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी पावसाचे पाणी साठवण अनिवार्य करावे, त्यासाठी डिजिटल ट्रॅकिंग, भौतिक पडताळणी आणि वेळोवेळी लेखापरीक्षण असलेली मजबूत देखरेख यंत्रणा उभारावी. नियमांचे पालन न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचे स्पष्ट प्रावधान असावे, अशीही मागणी करण्यात आली.

 

Web Title: Medha kulkarnis demand in rajya sabha to enable rainwater harvesting system for groundwater conservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • Medha Kulkarni
  • Pune Rain
  • Pune Water News

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: पुणेकरांनो जरा जपूनच! दोन ते दिवसांत असा कोसळणार की…
1

Maharashtra Rain Alert: पुणेकरांनो जरा जपूनच! दोन ते दिवसांत असा कोसळणार की…

Pune Rain Update: पुण्यात पावसाची ‘धडाकेबाज’ एन्ट्री; शहरात अनेक ठिकाणी बरसल्या जोरदार सरी
2

Pune Rain Update: पुण्यात पावसाची ‘धडाकेबाज’ एन्ट्री; शहरात अनेक ठिकाणी बरसल्या जोरदार सरी

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?
3

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.