Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Divorce : घटस्फोटांच्या प्रकरणांत लक्षणीय वाढ; धक्कादायक कारण जाणून घ्या सविस्तर

राज्यात गेल्या काही वर्षांत घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. विशेषतः शहरी भागांमध्ये या प्रकरणांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 22, 2026 | 12:59 PM
Divorce : घटस्फोटांच्या प्रकरणांत लक्षणीय वाढ; धक्कादायक कारण जाणून घ्या सविस्तर
Follow Us
Close
Follow Us:

बारामती : राज्यात गेल्या काही वर्षांत घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. विशेषतः शहरी भागांमध्ये या प्रकरणांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. कौटुंबिक न्यायालयांवरील ताणही वाढला आहे. विशेष बाब म्हणजे ग्रामीण भागात देखील घटस्फोटांचे प्रमाण वाढू लागले आहे, ही मोठी चिंतेची बाब आहे.

 

पुणे कौटुंबिक न्यायालयाच्या आकडेवारीनुसार, २०२६ या वर्षाच्या पहिल्या दीड महिन्यातच सुमारे ४४५ घटस्फोट अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी जवळपास ३५० अर्ज परस्पर संमतीने दाखल झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी २०२५ मध्ये पुण्यात एकूण २,३८० प्रकरणांची नोंद झाली होती. यंदाच्या सुरुवातीच्या आकडेवारीवरून प्रकरणांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बदलती जीवनशैली, करिअरकेंद्री दृष्टिकोन, वाढती आर्थिक स्वावलंबनाची भावना आणि नातेसंबंधांमधील संवादाचा अभाव ही वाढीची प्रमुख कारणे आहेत. लहान- सहान वाद, मतभेद आणि अहंकार यांमुळे तणाव वाढून नात्यात दुरावा निर्माण होत असल्याचे समुपदेशक सांगतात. याशिवाय मानसिक व शारीरिक छळ, व्यसनाधीनता, विवाहबाह्य संबंध आणि आर्थिक वाद यांसारखी पारंपरिक कारणेही मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत. महिलांमध्ये कायदेशीर हक्कांविषयी वाढलेली जागरूकता आणि सामाजिक बंधनांमधील शिथिलता यामुळे अन्याय सहन करण्याऐवजी कायदेशीर मार्ग स्वीकारण्याची प्रवृत्ती वाढली आहे. परिणामी, परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे.

कुटुंब व्यवस्थेतील बदल आणि वैयक्तिक स्वातंत्र्याला मिळणारे वाढते महत्त्व याचा थेट परिणाम विवाहसंस्थेवर होत आहे. घटस्फोटाचे प्रमाण वाढत असले तरी, अनेक जोडपी समुपदेशनाद्वारे नाते टिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही समोर आले आहे. राज्यातील घटस्फोटांची वाढती संख्या ही केवळ कायदेशीर बाब नसून, सामाजिक बदलाचे द्योतक मानली जात आहे. कौटुंबिक मूल्ये जपण्यासाठी संवाद, समजूतदारपणा आणि परस्पर आदर यांना अधिक महत्त्व देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान लग्न झाल्यानंतर एक महिन्याच्या आत घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल झाल्याची अनेक उदाहरणे देखील आहेत.

सोशल मिडियाचा अतिरेकी वापर महिला व पुरुषांमध्ये होत आहे, या अभासी माध्यमातून एकमेकांना पाठवल्या जाणाऱ्या संदेशेच्या माध्यमातून अनोळखी व्यक्ती एखाद्याला जवळची वाटते. त्यातून विवाहबाह्य संबंध वाढत आहेत, त्यातूनच घटस्फोटाचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्याचबरोबर पती-पत्नीने एकमेकांना समजून घेतले पाहिजे. एकमेकांना आदर देत, एकमेकांच्या आई वडील व सदस्यांचा आदर केला पाहिजे. समजूतदारपणा दोघांमध्येही असायला हवा, तरच पती-पत्नीचे नाते शेवटपर्यंत टिकेल. – ॲड रेश्मा लोणकर,बारामती.

Web Title: There is a huge increase in divorce cases in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • couple Divorce
  • Divorce
  • Divorce Case
  • love story

संबंधित बातम्या

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! ३२ वर्षांनंतर जोडप्याला घटस्फोट, एकाच दिवशी ६१ खटले निकाली
1

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! ३२ वर्षांनंतर जोडप्याला घटस्फोट, एकाच दिवशी ६१ खटले निकाली

Relationship Tips : तुमचा जोडीदार घटस्फोटाचा विचार तर करत नाही ना? या 11 संकेतांद्वारे ओळखा, नाहीतर …
2

Relationship Tips : तुमचा जोडीदार घटस्फोटाचा विचार तर करत नाही ना? या 11 संकेतांद्वारे ओळखा, नाहीतर …

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.