Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवभोजन केंद्रावरील गैरप्रकार खपवून घेणार नाही – मंत्री छगन भुजबळ

राज्यात शिवभोजन योजना सर्वात लोकप्रिय योजना ठरली आहे. सर्वसामान्य गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी शिवभोजन केंद्राची नियमित तपासणी करण्यात यावी. शिवभोजन केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास तातडीने कार्यवाही करा, अशा सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 13, 2022 | 05:00 PM
शिवभोजन केंद्रावरील गैरप्रकार खपवून घेणार नाही – मंत्री छगन भुजबळ
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शिवभोजन केंद्रावरील गैरप्रकार खपवून घेणार नाही. शिवभोजन केंद्रांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा कोणतीही अनियमितता आढळून आल्यास संबंधित केंद्रांना प्रथम वेळी कारणे दाखवा नोटीस द्या दुसऱ्यांदा देखील गैरप्रकार केल्यास मोठया रकमेचा दंड करावा आणि पुन्हा तिसऱ्यांदा गैरप्रकार आढळल्यास सदर आस्थापना कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई करावी, असे निर्देश अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले.

पुणे शासकीय विश्रामगह येथे भुजबळ यांनी अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने,अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले, वैधमापन विभागाच्या सहनियंत्रक सीमा बैस,परिमंडल अधिकारी गिरीष तावले, प्रशांत खताळ, चांगदेव नागरगोजे आदी उपस्थित होते.

[read_also content=”मोदी सरकार विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सीबीआय तसेच इडीचा वापर करत आहे : छगन भुजबळ https://www.navarashtra.com/pune/paschim-maharashtra/pune/modi-government-is-using-cbi-and-ed-to-discredit-the-opposition-chhagan-bhujbal-nrab-237609.html”]

राज्यात शिवभोजन योजना सर्वात लोकप्रिय योजना ठरली आहे. सर्वसामान्य गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी शिवभोजन केंद्राची नियमित तपासणी करण्यात यावी. शिवभोजन केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास तातडीने कार्यवाही करा, अशा सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या. शिवभोजन केंद्र देताना दिव्यांग तसेच महिला बचत गटांना प्राधान्य दिले जाते, या माध्यमातून अधिकाधिक गरजू महिलांना रोजगार मिळू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुणे शहर तसेच जिल्ह्यात दक्षता समित्यांची गतीने स्थापना करावी, असे सांगून भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात धान्याचा उपयोग संपुर्ण क्षमतेने करा.धान्याच्या दर्जाबाबत तक्रारी येता कामा नये अशा त्यांनी सूचना केल्या. पुणे जिल्ह्यात ५% धान्याची बचत होत असल्याने यामधून इतर पात्र सुमारे वीस हजार कार्ड धारकांना अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचा लाभ देण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.गरजु तसेच नियमात बसत असेल त्याला शिधापत्रिकेचे वितरण करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

[read_also content=”46 वर्षानंतर आता पुन्हा बसमधून करा दिल्ली-लंडन प्रवास; 18 देशातून 70 दिवसांच्या प्रवासासाठी 15 लाखांचा खर्च https://www.navarashtra.com/travel/travel/now-after-46-years-make-the-delhi-london-journey-by-bus-again-expenditure-of-rs-15-lakhs-for-70-days-journey-from-18-countries-nrvk-237613.html”]

ई पॉस मशीनचा वापर करतांना अनेक तक्रारी येत असल्याने काळानुरूप त्यात बदल करण्यात यावेत अशी मागणी अधिकाऱ्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली. त्यावर ई-पॉस मशीनमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत विचार करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. मात्र याबाबत आलेल्या तक्रारी दुर करण्याचा प्रयत्न करा असेही त्यांनी सांगितले. आधार जोडणी वाढविणे, कल्याणकारी संस्थांचे नियमन, पुणे जिल्ह्याचा आयएसओ उपक्रम आदीबाबत श्री. भुजबळ यांनी आढावा घेतला. तसेच साठवण क्षमता वाढविण्यासाठी गोदाम उभारणीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पुणे जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती देण्यात आली.

[read_also content=”यंदाच्या शिवजयंतीलाही कोरोना नियमांचे सावट, मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत शिवनेरीवर कार्यक्रम; अजित पवार यांची माहिती https://www.navarashtra.com/latest-news/even-on-this-years-shiv-jayanti-corona-rules-have-been-abolished-programs-on-shivneri-in-the-absence-of-the-chief-minister-information-of-ajit-pawar-nrdm-237605.html”]

Web Title: Will not tolerate malpractices at shivbhojan kendra says order of chhagan bhujbal nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2022 | 04:53 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • Pune
  • छगन भुजबळ

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
2

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
3

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या
4

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.