पुणे : पुण्यात होणाऱ्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत श्रीमठ पोलुरी, विवान चिटणीस, आरव काळे, प्रथमेश शेरला यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. त्रिबेका हायस्ट्रीट, एनआयबीएम पोस्ट ऑफिस रोड, कोंढवा या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत अ मध्ये 8 वर्षांखालील गटात सहाव्या फेरीत श्रीमठ पोलुरीने ऋत्वी हरपुडेचा पराभव करून 6 गुणांसह विजेतेपद पटकावले. 10वर्षाखालील गटात पाचव्या फेरीत विवान चिटणीसने मीत लाढेचा पराभव करून 5 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला.

शाश्वत गुप्तावर मिळवला विजय
12 वर्षाखालील गटात पाचव्या फेरीत आरव काळेने शाश्वत गुप्तावर विजय मिळवत 4.5गुणांसह विजेतेपदाचा मान पटकावला. 14 वर्षाखालील गटात पाचव्या फेरीत प्रथमेश शेरलाने राकेश माथीयाझगनला नमवून 5गुणांसह विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली.
निकाल : अ गट : 8 वर्षाखालील गट : सहावी फेरी :
ऋत्वी हरपुडे(4गुण) पराभुत वि. श्रीमठ पोलुरी(6गुण);
वेदांत क्षीरसागर(4.5गुण)बरोबरी वि. शिवम निगडे(4.5गुण);
कृष्णा येनगे (5गुण) वि.वि.रिधान जैन (4गुण);
प्रज्ञेश घोरपडे(4गुण)पराभुत वि. विहान शहा(5गुण);
अनय बोराटे (4गुण) वि.वि.विवांश कुलकर्णी(3गुण);
शिवांश बिलोरे(3गुण)पराभुत वि.अर्णव कांगो(4गुण);
10वर्षाखालील गट : पाचवी फेरी :
मीत लाढे (3.5गुण)पराभुत वि. विवान चिटणीस(5गुण);
केविन माथीयाझगन(4.5गुण) वि.वि.शौर्य कानसे (3गुण);
रिदम सेवलिया(4गुण) वि.वि.स्पृहा कासार(3गुण);
प्रियांश बलदोटा (3गुण)वि.वि.वेदांत साठे(2.5गुण);
रिधान अरगाडे(3गुण) वि.वि.खुशराज खांडगे(2गुण);
12 वर्षाखालील गट: पाचवी फेरी:
आरव काळे(4.5गुण) वि.वि.शाश्वत गुप्ता(4गुण);
लथीक राम(4गुण)वि.वि.वेदांत काळे(3.5गुण);
श्रवंथ रवतू (4गुण)वि.वि.अंश खैरे(3गुण);
वेदांग अस्निकर (4गुण) वि.वि.सुयोग राठी(3गुण);
भुवन कोन्नुर (3.5गुण) वि.वि.नौशिन शेख(2.5गुण);
14 वर्षाखालील गट: पाचवी फेरी:
राकेश माथीयाझगन(3.5गुण)पराभुत वि. प्रथमेश शेरला(5गुण);
दक्ष मारकन(3.5गुण)बरोबरी वि. आरुष बुडजादे (3.5गुण);
वरद गायकवाड(4गुण) वि.वि.प्रथमेश कांदेकर (2.5गुण);
स्पर्श बात्रा (3.5गुण) वि.वि.आदिना पठाण (2.5गुण);
अन्वय माळी (3.5गुण) वि.वि.सुहान पठाण(2.5गुण).






