Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंगणवाड्यांमध्ये आता ‘स्मार्ट’ शिक्षण! ३१५ नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी, मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा

नवीन अंगणवाड्या बालकांचे पोषण, आरोग्य तपासणी व पूर्व-शिक्षण अधिक परिणामकारकपणे पार पाडतील. तसेच गर्भवती व स्तनदा महिलांना आरोग्य सेवा आणि पोषण मार्गदर्शन सुलभपणे उपलब्ध होईल.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 29, 2025 | 12:22 PM
प्रत्येक तालुक्यातील ३१५ अंगणवाडी केंद्रांना मंजुरी (फोटो सौजन्य-X)

प्रत्येक तालुक्यातील ३१५ अंगणवाडी केंद्रांना मंजुरी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रत्येक तालुक्यातील ३१५ अंगणवाडी केंद्रांना मंजुरी
  • केंद्रांचे रूपांतर आदर्श आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त
  • आधुनिकीकरण करण्यासाठी “स्मार्ट अंगणवाडी किट”

राज्यातील अंगणवाड्यांच्या संदर्भात, त्या एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत कार्यरत आहेत, ज्या ६ वर्षांखालील मुलांचे पोषण, आरोग्य आणि पूर्व-प्राथमिक शिक्षण सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतात. याचदरम्यान आता महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी “स्मार्ट अंगणवाडी किट” खरेदीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ३१५ अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून, या केंद्रांचे रूपांतर आदर्श आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त ‘स्मार्ट अंगणवाड्यां’मध्ये करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

St Bus News : एसटीला दिवाळी हंगामात 301 कोटी रुपये उत्पन्न, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

या योजनेमुळे प्रत्येक अंगणवाडीत शिक्षण, आरोग्य, पोषण, स्वच्छता व बालसंगोपनासाठी आवश्यक असणारे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. केंद्रांमध्ये मुलांसाठी आनंददायी, सुरक्षित आणि शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यास मदत होईल.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, “स्मार्ट अंगणवाडी योजनेमुळे राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील लहान मुलांना सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी शिक्षणाचे वातावरण उपलब्ध होईल. मुलांच्या सर्वांगीण विकासासोबतच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वाचा टप्पा ठरेल.”

रायगड जिल्ह्यातील माणगाव, तळा, श्रीवर्धन, रोहा, म्हसळा, महाड, अलिबाग, पोलादपूर, कर्जत, खालापूर, सुधागड आणि पनवेल या सर्व तालुक्यांतील अंगणवाड्या या योजनेत समाविष्ट आहेत. यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील बालकांना दर्जेदार शिक्षण, पोषण आणि आरोग्यसेवा मिळणार असून स्थानिक अंगणवाड्या आधुनिक शिक्षण व आरोग्य विकासाचे केंद्र म्हणून विकसित होतील.

या प्रकल्पामुळे अंगणवाडी सेविकांना तंत्रज्ञानाधारित शिक्षण पद्धती व पोषण व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच, बालकांच्या वाढीचा, आरोग्याचा व पोषणस्थितीचा मागोवा घेण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर होईल. नवीन अंगणवाड्या बालकांचे पोषण, आरोग्य तपासणी व पूर्व-शिक्षण अधिक परिणामकारकपणे पार पाडतील. तसेच गर्भवती व स्तनदा महिलांना आरोग्य सेवा आणि पोषण मार्गदर्शन सुलभपणे उपलब्ध होईल.

महिला व बालविकास विभाग राज्यातील अंगणवाड्या सुसज्ज, आकर्षक आणि कार्यक्षम बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून ‘स्मार्ट अंगणवाडी योजना’ ही बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने उचललेले अत्यंत महत्त्वाचे आणि दूरदृष्टीचे पाऊल ठरणार आहे.

BMC Election: उद्धव ठाकरे गटाचा  मोठा निर्णय; ज्येष्ठ नगरसेवकांचा पत्ता कट होणार

Web Title: Raigad anganwadi smart modern makeover kit child development initiative aditi tatkare news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • Aditi Tatkare
  • raigad

संबंधित बातम्या

रायगडच्या विकासाला निधीअभावी खीळ; MMRDA च्या रखडलेल्या कामांवरून माजी आमदार पंडित पाटील आक्रमक
1

रायगडच्या विकासाला निधीअभावी खीळ; MMRDA च्या रखडलेल्या कामांवरून माजी आमदार पंडित पाटील आक्रमक

Karjat :९० टक्के भात पीक नष्ट । एकरी ५० हजार भरपाईची शेतकऱ्यांची मागणी
2

Karjat :९० टक्के भात पीक नष्ट । एकरी ५० हजार भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

कर्जतमध्ये शेतकऱ्यांसाठी ‘ड्राय डायरेक्ट पेरणी’ भात तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक; ५०% पाण्याची बचत, उत्पादन वाढणार
3

कर्जतमध्ये शेतकऱ्यांसाठी ‘ड्राय डायरेक्ट पेरणी’ भात तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक; ५०% पाण्याची बचत, उत्पादन वाढणार

कर्जत तालुक्यातील शेतकरी आक्रमक! अतिवृष्टीमुळे भाताचे ९०% पीक खराब, एकरी ५० हजाराच्या मदतीची मागणी
4

कर्जत तालुक्यातील शेतकरी आक्रमक! अतिवृष्टीमुळे भाताचे ९०% पीक खराब, एकरी ५० हजाराच्या मदतीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.