Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panvel Municipal Corporation: पनवेल पंचायत समितीवर भाजपचे कमळ; रंजना वास्कर सभापती, भूपेंद्र पाटील उपसभापती

पनवेल तालुका पंचायत समितीच्या राजकारणात भाजपच्या वतीने करंजाडे गणातून निवडून आलेल्या रंजना सदाशिव वास्कर सभापतीपदी तर आदई गणातून निवडून आलेले भूपेंद्र सदानंद पाटील हे उपसभापती विराजमान झाले आहेत.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 12, 2026 | 04:57 PM
पनवेल पंचायत समितीवर भाजपचे कमळ; रंजना वास्कर सभापती, भूपेंद्र पाटील उपसभापती

पनवेल पंचायत समितीवर भाजपचे कमळ; रंजना वास्कर सभापती, भूपेंद्र पाटील उपसभापती

Follow Us
Close
Follow Us:

Panvel Municipal Corporation: पनवेल तालुका पंचायत समितीच्या राजकारणात ऐतिहासिक बदल घडला असून पहिल्यांदाच भाजपाचे कमळ या समितीवर फुलले आहे. भाजपच्या वतीने करंजाडे गणातून निवडून आलेल्या रंजना सदाशिव वास्कर सभापतीपदी तर आदई गणातून निवडून आलेले भूपेंद्र सदानंद पाटील हे उपसभापती विराजमान झाले आहेत. अनेक दशकांपासून पंचायत समितीवर असलेला शेकापचा एकछत्री अंमल आता संपुष्टात आली आहे.

या निवडीनंतर घोषणा, ढोलताशा आणि फटाक्यांच्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुतळ्यास तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. विजय अद्भुतपूर्व असला तरी या विजयी जल्लोषात विनम्रपणा स्पष्टपणे जाणवत होता. पनवेल आणि रायगड परिसरात शेतकरी कामगार पक्षाचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले होते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या पक्षाचे लोकप्रतिनिधी सातत्याने निवडून येत होते. मात्र २००९ नंतर या वर्चस्वाला हळूहळू उतरती कळा लागली.

सर्वप्रथम पनवेल नगरपरिषदेत शेकापला धक्का बसला, त्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्येही पराभवाचा सामना करावा लागला. त्याच काळात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या मतदारसंघासोबत रायगड जिल्ह्यात मजबूत पकड निर्माण केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सलग चार टर्म आमदार म्हणून नेतृत्व करताना राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली.

यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, महापौर नितिन पाटील, माजी सभागृहनेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर, युवा नेते प्रितम म्हात्रे यांच्यासह इतर नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी सभापती, उपसभापती यांचे अभिनंदन केले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, युवा नेते परेश ठाकूर व प्रितम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आली. पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकापला एकही सदस्य निवडून आणता आला नाही. भाजपने १६ पैकी तब्बल १५ सदस्य निवडून आणत शेकापचा अक्षरशः व्हाईट वॉश केला. मार्केट यार्ड येथे सर्व संदस्यांचा जाहीर सत्कार देखील आयोजित करण्यात आला.

पनवेल महानगरपालिकेतही भाजपने सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता प्रस्थापित केली. शहरात भाजपची सत्ता असली तरी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकत होता. मात्र २०१७ नंतर ग्रामीण भागातही भाजपचा प्रभाव वाढू लागला. त्याचे स्पष्ट चित्र नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दिसून आले.

Web Title: Bjps lotus on panvel panchayat samiti ranjana vaskar as chairperson bhupendra patil as deputy chairperson

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Panvel Municipal Corporation

संबंधित बातम्या

Panvel Municipal Corporation: विकसित महाराष्ट्र २०४७ साठी पनवेल ग्रोथ हब; आमदार प्रशांत ठाकूर यांचे विधानसभेत मत
1

Panvel Municipal Corporation: विकसित महाराष्ट्र २०४७ साठी पनवेल ग्रोथ हब; आमदार प्रशांत ठाकूर यांचे विधानसभेत मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.