Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : मुंबई गोवा महामार्गावरील ‘या’ भागत अवजड वाहनांना प्रवेश बंदी, प्रशासनाने दिले आदेश

मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची सतत ये जा सुरु असते अशातंच आता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरी किल्ले रायगडाच्या जवळपास असलेल्या भागात प्रशासनाने अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 04, 2025 | 03:05 PM
Raigad News : मुंबई गोवा महामार्गावरील ‘या’ भागत अवजड वाहनांना प्रवेश बंदी, प्रशासनाने दिले आदेश
Follow Us
Close
Follow Us:

रायगड : मुंबई गोवा महामार्गावरुन जाणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा आदेश जारी करण्यात आला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त किल्ले रायगड या ठिकाणी दाखल होतात. त्याचबरोबर नेते मंडळी देखील राज्याभिषेक सोहळ्याला राजांना मुजरा करण्यास येत असतात. याचपार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरी किल्ले रायगडाच्या जवळपास असलेल्या भागात प्रशासनाने अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.

‘या’ भागात अवजड वाहनांना प्रवेश बंदी

शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून दि.05 जून रोजी सायं.4.00 ते दि.06 जून 2025 रोजी रात्रौ 10.00 वाजेपर्यतच्या कालावधीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांना नो एन्ट्री.

वाकणफाटा नागोठणे ते कशेडी
माणगांव-निजामपुर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला,
माणगांव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला,
महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गावरील होणारी सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतुक बंदी अधिसूचना जारी केली आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा हा कार्यक्रम दि.05 जून व दि.06 जून रोजी किल्ले रायगड येथे साजरा होणार आहॆ. या कार्यक्रमासाठी रायगड, पुणे, सातारा, कोल्हापुर, मुंबई वैगेरे ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने शिवभक्त हे आपआपली वाहने घेवून येत असतात. तसेच सदर कार्यक्रमाकरीता आयोजकांच्या सामानाची वाहने देखील मोठ्या प्रमाणात शिवराज्याभिषेक सोहळ्याकरीता येत असतात.

या सोहळ्याकरीता येणारे शिवभक्त हे रायगड किल्ला येथे माणगांव-निजामपुर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगांव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला,महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला असे जाण्याचे एकूण तीन मार्ग आहेत. या मार्गावरून शिवभक्त हे आपआपल्या वाहनाने मोठ्या संख्येने येत असतात. तसेच शासकीय यंत्रणा यांच्या वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते. सदर शिवभक्तांची वाहने ही मुंबई-गोवा महामार्गावरून कशेडी घाट ते महाड, तसेच वाकणफाटा-नागोठणे-कोलाड-माणगांव-महाड या महामार्गावरून येत असतात. त्यातच मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहनांची देखील प्रचंड प्रमाणात वाहतूक होत असते अशावेळी अपघात, वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या कार्यकमाच्या वेळी कोठे ही वाहतुक कोंडी निर्माण होवू नये व श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याकरीता येणारे शिवभक्त यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जिल्हाधिकारी जावळे वाहतूक बंदी जाहीर केली आहॆ.
सदरची वाहतूक पंपी अधिसूचना ही दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला इत्यादी जिवनावश्यक वस्तु चाहून नेणारी वाहने, मोवीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने, रुग्णवाहीका या वाहनांना लागू राहणार नाही.
या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Web Title: Heavy vehicles banned from mangaon to raigad fort administration orders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • Mumbai Goa Express Way
  • raigad
  • Shivrajyabhishek

संबंधित बातम्या

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध
1

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट
2

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Khopoli : खोपोलीत पोलिसांची कारवाई! हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड, १७ जण ताब्यात
3

Khopoli : खोपोलीत पोलिसांची कारवाई! हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड, १७ जण ताब्यात

Raigad : चंद्रकांत पाटील यांनी लोणेरे अभियांत्रिकी विद्यापीठाचा घेतला आढावा
4

Raigad : चंद्रकांत पाटील यांनी लोणेरे अभियांत्रिकी विद्यापीठाचा घेतला आढावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.