Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai: रस्ता रुंदीकरणासाठी पालिका अ‍ॅक्शनमोडवर; टपाल नाका परिसरात अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई

टपाल नाका येथे रस्ता रूंदीकरणासाठी नऊ गाळ्यांवरती कारवाई करण्यात आली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 08, 2025 | 05:54 PM
Navi Mumbai: रस्ता रुंदीकरणासाठी पालिका अ‍ॅक्शनमोडवर; टपाल नाका परिसरात अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई
Follow Us
Close
Follow Us:

पनवेल:टपाल नाका येथे रस्ता रूंदीकरणासाठी आयुक्त तथा प्रशासक श्री.मंगेश चितळे यांच्या निर्देशानूसार ,स्वत: अतिक्रमण उपायुक्त रविकिरण घोडके व प्रभाग ड पनवेलच्या सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक ७ फेब्रुवारी रोजी नऊ गाळ्यांवरती कारवाई करण्यात आली. जेसीबी, डंपर , पोखलॅडच्या साहाय्याने सुमारे 2 हजार 36 स्वेअर फूट बांधकामांवर अतिक्रमण विभागाच्यावतीने यावेळी तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अनेक वर्षापासूनचा टपाल नाक्यावरील रस्ता रूंदीकरणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे.

Navi Mumbai: आरोग्यम् धनसंपदा; आरोग्य योजनांचे लाभ मिळणार खासगी रुग्णालयात

यावेळी कारवाईवेळी सहाय्यक संचालक नगर रचना केशव शिंदे , सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर, तसेच प्रभाग अधिक्षक सदाशिव कवठे, प्रभारी अधिक्षक रोशन माळी, प्रभारी अधिक्षक अरविंद पाटील, महापालिकेचे अधिकारी सुधीर सांळुखे, राजेश कर्डिले, जयराम पादीर, प्रितम पाटील, संदिप पवार तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.तसेच पनवेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजरत्न खैरनार, वाहतुक वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Navi Mumbai: शिवरायांच्या सिंहासनारूढ मूर्तीची होणार स्थापना; नेरूळमध्ये अवतरली शिवशाही

टपाल नाका येथे दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी वाढू लागल्याने याठिकाणी रस्ता रूंदीकरण करणे महत्वाचे होते. याबाबत मा. मुंबई उच्च न्यायालयात दोन रिट याचिका सादर करण्यात आल्या होत्या, परंतु दिनांक 6 फेब्रुवारी २०२५ रोजी मा.मुंबई उच्च न्यायालयाने सदर दोन्ही याचिका सुनावाणी अंती फेटाळून लावलेल्या आहेत. त्यामुळे रस्ता रूंदीकरण कामात डथळा येणाऱ्या नऊ गाळयांवर आज पालिकेच्यावतीने डंपर , पोखलॅड, जेसीबीच्या साहाय्याने मोठी निष्कांसन कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे टपाल नाक्यावरील वाहतुकीची समस्या सोडविली जाणार असून पनवेल, करंजाडे मधील होणारी वाहतुक जलद होणार आहे. या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.या कारवाई प्रसंगी धूळ प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने वॉर्ड अधिकारी डॉ. रुपाली माने यांच्या संकल्पनेनुसार पालिकेच्या वॉटर कॅनॉनचा यावेळी वापर केला. निष्कांसन कारवाई दरम्यान या वॉटर कॅनॉनचा वापर करुन नागरिकांना धुळीचा त्रास होऊ नये तसेच कमीत कमी धूळ प्रदूषण व्हावे याकरिता प्रयत्न करण्यात आला आहे.

Web Title: Navi mumbai municipality on action mode for road widening big action against encroachment in postal naka area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 05:53 PM

Topics:  

  • Traffic Issue

संबंधित बातम्या

Bhayander News : अनधिकृत पार्किंग ठरतेय मृत्यूचा सापळा ; वाहतूक विभागाच्या निष्काळजीपणावर संतापाची लाट
1

Bhayander News : अनधिकृत पार्किंग ठरतेय मृत्यूचा सापळा ; वाहतूक विभागाच्या निष्काळजीपणावर संतापाची लाट

बारामतीत वाहतूक पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’वर; 107 वाहनांवर कारवाई करत एक लाखाचा दंड वसूल
2

बारामतीत वाहतूक पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’वर; 107 वाहनांवर कारवाई करत एक लाखाचा दंड वसूल

Thane News :   ठाणेकरांसाठी खुशखबर! कारासवडवली उड्डाणपूलाचं होणार लोकार्पण
3

Thane News : ठाणेकरांसाठी खुशखबर! कारासवडवली उड्डाणपूलाचं होणार लोकार्पण

Karjat News : कर्जत कोंडीवडे रस्त्यावर पाण्याने भरलेल्या डबक्यात आंदोलन; पोलिस मित्र संघटनेचे आंदोलन सुरू
4

Karjat News : कर्जत कोंडीवडे रस्त्यावर पाण्याने भरलेल्या डबक्यात आंदोलन; पोलिस मित्र संघटनेचे आंदोलन सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.