विधानसभा उपाध्यक्षपदासाठी 'या' तीन आमदारांची नावं चर्चेत; अण्णा बनसोडे यांचं नाव आघाडीवर...
पनवेल ग्रामीण/दीपक घरत : निवडणूक जिकण्यासाठी प्रत्येक पक्ष विगवेगळ्या क्लुप्त्या लढवतात. त्याचाच एक भाग म्हणून प्रमुख उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले जातात. पनवेल आणि उरणमध्ये देखील नावात साधर्म्य असलेले उमेदवार निवणूक लढत असून,पनवेल ग्रामीण शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या नावाचे दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. तसंच उरणमध्ये देखील शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या नावाशी साम्य असलेले दोन उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.
हेही वाचा-“मी निवडणूक लढवणार नाही…सत्ताबदलातील महत्त्वाचा मास्टरमाईंड, शरद पवारांची राजकारणातून निवृत्ती?
ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवलेल्या मनोहर भोईर यांच्यासमोर मनोहर परशुराम भोईर या अपक्ष उमेदवाराचे आव्हान असणार आहे. नावात साध्यर्म असलेले उमेदवार उभे करून एखाद्या उमेदवाराला पाडण्याचा प्रकार यापूर्वीच्या अनेकदा निवडणुकांमध्ये दिसून आला आहे. मतांची विभागणी झाल्याने उमेदवार पराभूत झाल्याचेही प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. मात्र ही खेळी सातत्याने केली जात असल्याने यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमधून दिसून आली आहे.
हेही वाचा-निवडणुकीत जनतेच्या ताकदीमुळे आपला विजय नक्कीच ! पेणमधील शेकापचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना विश्वास
यंदाच्या निवडणुकीतही पनवेल आणि उरणमध्ये देखील या निवडणूकीत हीच जुनी खेळी खेळण्यात आली आहे. पनवेलमध्ये तीन बाळाराम पाटील तर उरणमध्ये तीन प्रीतम म्हात्रे आणि दोन मनोहर भोईर अशी या उमेदवारांची नावं आहेत. सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. .यावेळी पनवेलमधून 2 अपक्ष उमेदवांरांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता पनवेल मतदार संघातून एकूण 13 उमेदवार ही निवडणूुक लढणार आहेत. तसंच उरण मधील 2 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने 14 उमेदवारांमध्ये हा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.
भाजपा महायुतीतर्फे चौथ्यांदा निवडणूक लढवणार असलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या दोघांनी अपक्ष म्हणून आपले अर्ज दाखल केले होते. मात्र दोघांचेही अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे आता ठाकूर आडनावामुळे होणारे विभाजन टळले आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्शभूमीवर पनवेल आणि उरणप्रमाणेच कणकवलीत देखील नावाशी सारखेपणा असलेले उमेदवांरांवरुन आरोप प्रत्योरोप करण्यात आले होते. ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पाकर यांच्या नावाशी साकखेपणा असलेल्या सदस्याला भाजपने उमेदवार जाहीर केली.
सदर प्रकरणावर ठाकरे गटाचे आमदार संदेश पारकर यांनी नितेश राणे यांच्यावर शाब्दिक घणाघात केला. आमदार संदेश पारकर म्हणाले की, नितेश राणेंचे भविष्य त्यांना कळून चुकलेले आहे. संदेश पारकर यांना जनाधार मिळाल्याने ते निवडून येणार. म्हणूनच पारकरांना पडणारी मतांची विभागणी व्हावी किंवा दुसरीकडे मतदान व्हावं यासाठी राणेंचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. मात्र जनता सुज्ञ आहे. येत्या 20 तारीखेला मतदान होईल.त्यानंतर जनतेचा कौल हा दि. 23 तारीखेला पाहायला मिळेल. विधानसभेच्या या निकालावर महाविकास आघाडीचा भगवा फडकलेला आपल्याला दिसेल, असं संदेश पारकर म्हणाले होते.