Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad : उल्हास नदीतील 935 किलो कचरा केला साफ ; दहिवली परिसर विचारमंचाची स्वच्छता मोहिम

दहिवली गाव परिसर विचारमंच आणि कर्जत नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने उल्हास नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विचारमंच्या तरुणांनी नदीतील दूषित पाण्यात उतरून घाण साफ केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 29, 2025 | 12:18 PM
Raigad :  उल्हास नदीतील 935 किलो कचरा केला साफ ; दहिवली परिसर विचारमंचाची स्वच्छता मोहिम
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/ संतोष पेरणे : कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदी परिसराची दहिवली भागातील स्वच्छता सालाबादप्रमाणे करण्यात आली. दहिवली परिसर विचारमंच यांच्या माध्यमातून आज ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली,त्यात तब्बल एक ट्रॅक्टर आणि ९३५ किलो कचरा संकलित करण्यात आला.दहिवली गाव परिसर विचारमंच आणि कर्जत नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने उल्हास नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

दहिवली ग्रामस्थ आणि विचारमंच समुहाचे सुनिल जाधव,शशांक शेट्टी, प्रविण गांगल,विकास चित्ते, दिनेश कडू,अशोक घोंगे पाटील, अशोक पवार,मिलिंद चिखलकर,स्वाती कदम शिंदे , लता कुलकर्णी ,शामकांत कदम , भरत बामणे,दिपंकार सालये, गणेश कनोजे,भाऊ खानविलकर,दामोदर उर्फ आप्पा कारुळकर,सखाराम सोनवणे, राहुल गायकवाड, नितीन शिंदे, जयप्रकाश जाधव,संजय चंदने तसेच कर्जत शहरातील महेंद्र उर्फ भाऊ कर्वे यांनी नदी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.नगरपालिका प्रशासनाचे वतीने कार्यालयीन अधीक्षक रविंद्र लाड,स्वच्छता निरीक्षक रुपेश भोईर,सुनिल लाड,भासे , पर्यवेक्षक हे उपस्थित होते.तर पालिकेचे स्वच्छता मुकादम निकेश मारुती फाळे तसेच सफाई कामगार परेश गरुडे, अमोल जाधव,आकाश परदेशी,प्रज्वल सोनावणे,तेजस सोनावणे,श्रीकांत वाघेला , केतन गायकवाड,रवी सरावते,अनिल चंदन,रवी गायकवाड ,विश्वदीप रणदिवे, कुमार परदेशी,धिरज चौधरी, अरविंद पादीर यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

महेंद्र महाडिक आणि ईश्वर वाघेले या तरुणांनी नदीतील दूषित पाण्यात उतरून घाण पाण्यात उतरुन सुकलेली झाडे तसेच ओंडके आणि कचरा गोळा करुन नदी किनारी आणून दिला.या मोहिमेत एकुण एक टॅक्टर आणि ९३५ किलो कचरा नदी मधून बाहेर काढण्यात आला.यामध्ये अतिशय दुर्गंधी सुटलेल्या प्लॅस्टिक पिशव्या , निर्माल्य असलेल्या पिशव्या, वाहून आलेले तसेच अडकलेले मोठे झाड व ओंडके,पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्या,काचेच्या बाटल्या,टाकलेली कापडे काढण्यात आली.पुलावरून आणि आजूबाजूने टाकण्यात आलेला कचरा त्यात मुख्यतः प्लास्टिक , जुने सामान ,निर्माल्य याचा समावेश होता. त्यात भर म्हणून वरून वाहून येणारा कचरा , सांडपाणी , मलमूत्र , यामुळे बदललेला पाण्याचा रंग, हे सर्व भयानक दृश्य बघवत नव्हते मागच्या वर्षी पण हीच परिस्थिती होती. त्यावेळी याच महिन्यात अशी मोहीम राबवली होती. यावर्षी तोच कचरा ,तशीच घाण नदीत केली गेली. या घाणीने दुर्गंधी सुटली होती.ती सर्व कचरा उचलण्यात आला.

प्रशासनाचे वतीने रविंद्र लाड व विचारमंचाचे वतीने विकास चित्ते,शशांक शेट्टी आणि सुनिल जाधव यांनी खालील आवाहन केले.
१)नदीत कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये.
२) प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा.
३) गाव परिसर व नदी परिसर स्वच्छ ठेवावा.
४) प्रशासनाला सहकार्य करावे.

Web Title: Raigad 935 kg of garbage cleaned from ulhas river dahivali area discussion forums cleanliness drive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • Karjat
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News: “दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्राची कामे…”; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचे निर्देश
1

Raigad News: “दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्राची कामे…”; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचे निर्देश

Matheran Accident : अवघड वळणावर कारचं नियंत्रण सुटलं अन्…, माथेरान घाटात मारुती स्विफ्ट गाडीला अपघात
2

Matheran Accident : अवघड वळणावर कारचं नियंत्रण सुटलं अन्…, माथेरान घाटात मारुती स्विफ्ट गाडीला अपघात

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन
3

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Raigad Boat Accident : मोठी बातमी! रायगड समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरु
4

Raigad Boat Accident : मोठी बातमी! रायगड समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.