12 नापास कुमार शर्मा ते आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा हा खडतर प्रवास 12 Fail या सिनेमातून सगळ्यांपर्यंत पोहोचला.अशीच काहीशी गोष्ट आहे ती म्हणजे कर्जतच्या आदिवासी पाड्यातील एका तरुणाची.
कर्जत तालुक्यातील हे गाव लोकसंख्या अवघी दीड हजार, पण या छोट्या गावाने पाणीटंचाईच्या मोठ्या वेदना पिढ्यानपिढ्या सहन केल्या आहेत. वर्षानुवर्षे मातीचा बंधारा बांधला जातो, ग्रामस्थ स्वतः हाताने काम करतात, पण…
सततच्या पावसामुळे रायगडच्या कर्जत तालुक्यातील भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करून एकरी ५० हजार रुपये भरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी 'ड्राय डायरेक्ट पेरणी भात' (DDSR) तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक पाहिले. किसान क्राफ्टने आयोजित केलेल्या या प्रशिक्षणातून भात लागवडीसाठी ५०% पाणी बचत कशी होते, हे समजावले गेले.
कर्जत तालुक्यात सततच्या पावसामुळे भाताचे ९०% पीक खराब झाले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन तातडीने एकरी ५०,००० रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. प्रशासनाकडून सरसकट पंचनामे करण्याचे आश्वासन.
अतिवृष्टी, मुसळधार सरी, ढगफुटीच्या घटनांनी शेतातील पिके अक्षरशः वाहून गेली. मराठवाडा, खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या सर्वच भागांतील शेतकरी संकटाच्या गर्तेत आहेत.
नगरपरिषदेच्या मालमत्ता करावरील अतिरिक्त मालमत्ता करमाफीच्या अभय योजनेसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी कर्जत शहर शिवसेना यांच्यावतीने करण्यात आली.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मुस्लिम बहुल दामत गावात मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तल होत असल्याच्या तक्रारी सुरु होत्या.याप्रकरणी नेरळ पोलिसांनी धाड टाकली आणि गोवंश मांस तसेच कत्तल करणारे तीन जणांना ताब्यात…
कर्जत तालुक्यातील २०८ गावांमधील भाताच्या शेतीचे पंचनामे करण्याचे कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. कृषी,महसूल आणि ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर पोहचले आहेत.
कर्जत तालुक्यातील ओबीसी समाज संघटना महासंघ आक्रमक झाला आहे. कुणबी जातीचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख करून मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्यास संघटनेचा ठाम विरोध आहे.
महायुती सरकारने 'महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा' लागू करण्याची तरतूद विधिमंडळात केली आहे. या कायद्याविरोधात संघर्ष समिती व उद्धवसेनेच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वीरित्या राबवून जिल्हा राज्यात अभियानात अग्रेसर राहील, यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.
माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दैवबलवत्तर म्हणून यातील प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत.
कर्जत तालुक्याच्या आगरी समाज हॉलचे सुशोभीकरणासाठी दहा लाखाचा निधी कामगार नेते राष्ट्रीय इंटक अध्यक्ष महेंद्र घरत यांनी जाहीर केले. तसेच 160 विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्यात मान्यवर उपस्थित होते.
कर्जत तालुक्यातील युवा पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे.
कर्जत मधील वाहतुकीची समस्या जटील बनली आहे. त्यावर मार्ग निघावा म्हणून महाराष्ट्र भुषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून कर्जत साठी शंभर बॅरिकेटस देण्यात आले.