Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न! ‘आपला दवाखाना’ नावापुरताच? सुविधांच्या अभावामुळे रुग्ण झाले हैराण

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा मान राखत तरी शासनाने आपला दवाखाना पुन्हा नव्याने कार्यान्वित करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व रुग्णांकडून होत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 15, 2026 | 12:02 PM
Raigad News: आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न! ‘आपला दवाखाना’ नावापुरताच? सुविधांच्या अभावामुळे रुग्ण झाले हैराण

Raigad News: आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न! ‘आपला दवाखाना’ नावापुरताच? सुविधांच्या अभावामुळे रुग्ण झाले हैराण

Follow Us
Follow Us:
  • दवाखान्यातील गैरसोयींवर नागरिकांचा संताप
  • आपला दवाखाना’ की गैरसोयींचं केंद्र?
  • ‘आपला दवाखाना’वर नागरिकांची तीव्र नाराजी
महाड: महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत महाड शहरात मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सध्या अत्यंत बिकट अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे. सुरुवातीच्या काळात उत्साहात लोकार्पण झालेला हा दवाखाना आता तब्बल एक ते दीड वर्ष डॉक्टरविना असून येथे कोणतीही नियमित वैद्यकीय सेवा अथवा औषधोपचार उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती नागरिकांकडून मांडली जात आहे. आरोग्य विभागांतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यभर सुरू झालेल्या या योजनेच्या माध्यमातून महाड शहरातील जिजामाता भाजी मार्केट येथील इमारतीमध्ये या दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले होते.

लग्नाच्या आनंदात आले, मेट्रोच्या पिलरखाली सापडला मृत्यू; जौनपूरच्या सरपंचांचा मुंबईत दुर्दैवी अंत

मंत्री गोगावलेंच्या पुढाकाराची मागणी

ज्यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली, त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा मान राखत तरी शासनाने या दवाखान्याला पुन्हा नव्याने कार्यान्वित करावे, आवश्यक वैद्यकीय कर्मचारी व औषधसामग्री उपलब्ध करून द्यावी आणि सुरुवातीला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व रुग्णांकडून होत आहे. महाड शहरातील गोरगरिबांसाठी आणि ज्यांना खाजगी रूग्णालयात उपचार घेणे शक्य अशा रूग्णांसाठी आधार ठरू शकणारी ही ‘आपला दवाखाना’ची शासकीय सेवा पुन्हा पूर्ववत सुरू होणे ही काळाची गरज असून मंत्री भरत गोगावले यांनी देखील स्वतः लक्ष घालून यासाठी पुढाकार घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.  (फोटो सौजन्य – Instagram)

कायमस्वरूपी डॉक्टरच नाहीत

‘आपला दवाखाना’ बाबात सध्याची परिस्थिती याच्या पूर्णपणे विरुद्ध असल्याचे दिसून येत आहे. दवाखान्यात कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचाराविना परत जावे लागत आहे. औषधसाठा नसणे, कर्मचारी अनुपस्थिती आणि बहुतांश वेळा बंद दरवाजे अशी अवस्था निर्माण झाल्याने ‘आपला’ म्हणून सुरू करण्यात आलेला दवाखाना प्रत्यक्षात मात्र रुग्णांसाठी ‘परका’ ठरत असल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

Jay Pawar News: ‘Mom आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान’…; जय पवारांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

मोफत वैद्यकीय सुविधा देण्याची केली होती घोषणा

या लोकार्पण सोहळ्यास महाड विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार व सध्याचे कैबिनेटमंत्री भरत गोगावले याची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी मोफत तपासणी, औषधोपचार, बाहह्यरुग्ण सेवा, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, नेत्रतपासणी तसेच विविध प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. प्रारंभीच्या दोन महिन्यांत तब्बल ८०० हून अधिक रुग्णांनी या दवाखान्याचा लाभ घेतल्याची नोंदही समोर आली होती.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Raigad health crisis patients distressed as basic facilities missing at aapla davakhana raigad news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Mahad
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Rain Alert: या जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट; आज (२ जुलै) शाळांना सुट्टी जाहीर, तुमच्या भागातील शाळा बंद राहणार का? जाणून घ्या
1

Rain Alert: या जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट; आज (२ जुलै) शाळांना सुट्टी जाहीर, तुमच्या भागातील शाळा बंद राहणार का? जाणून घ्या

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष
2

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं
3

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत
4

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.