Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : अवकाळी पावसाने बळीराजा संकटात; नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करा, महेंद्र थोरवेंची मागणी

अवकाळी पावसाने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याचपार्श्वभूमीवर कर्जतमध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करण्याची मागणी केली जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 15, 2025 | 06:39 PM
Raigad News : अवकाळी पावसाने बळीराजा संकटात; नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करा, महेंद्र थोरवेंची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/ संतोष पेरणे : कर्जत आणि खालापूर तालुक्यात शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन होत नाही हे दुर्दैव असून पाच वर्षात असे मंच उभे राहिले नाही ही बाब गंभीर असून कृषी संशोधन केंद्र मधील तुमची नियुक्ती कशासाठी आहे? याचा जाब विचारला जाईल असे कृषी संशोधन केंद्राला ठणकावून सांगत आमदार महेंद्र थोरवे यांनी हमी भावाने भाताची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळत नाही ही भूमिका अतिशय चुकीची असल्याचा आरोप थोरवे यांनी केला.कर्जत उपविभाग खरीप हंगाम आढावा बैठकीमध्ये आमदार थोरवे यांनी कर्जत तालुका कृषी पर्यटन तालुका जाहीर व्हावा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे देखील यावेळी जाहीर केले.

कर्जत उपविभाग खरीप आढावा बैठकीचे आयोजन भात संशोधन केंद्रात केले होते.आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीला प्रांत अधिकारी प्रकाश संकपाल, खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण, उप विभागीय कृषी अधिकारी निंबाळकर, सहायक निबंधक संस्था शिवाजी घुले,निवासी नायब तहसिलदार सुधाकर राठोड,कृषी संशोधन केंद्राचे डॉ गवई,कर्जत पंचायत समिती अतिरिक्त गटविकास अधिकारी बोरकर तसेच तालुका कृषी अधिकारी शिंदे,मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी,किरण गंगावणे,भात खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष काशिनाथ ठमके, आत्माचे सदस्य चंद्रकांत मांडे, नैसर्गिक शेती शेतकरी रवींद्र झांजे,प्रगत शेतकरी सुनील रसाळ,ॲड प्रदीप सुर्वे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अजित पाटील,शेळके,शेतकरी वैशाली ठाकरे,आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

खरीप हंगाम आढावा बैठक उप विभागीय कृषी अधिकारी सुनील निंबाळकर यांनी प्रास्ताविक करताना खरीप हंगामाची सुरुवात असताना आपली उत्पन्न भरपूर आहे,पण उत्पादकता वाण करण्यात आपण कमी आहेत.तर कृषी अधिकारी शिंदे यांनी तालुक्याचा खरीप आढावा या बैठकीत मांडला.प्रगत शेतकरी शशिकांत मोहिते, चंद्रकांत मांडे यांनी आपली मनोगत मांडली.

कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खरीप हंगाम सुरू होत असताना बियाणे,खते, कीटकनाशक यांचा मुबलक साठा राहिला पाहिजे.कोणताही शेतकरी मूलभूत सुविधा यांच्यापासून वंचित राहू नये अशी सूचना आमदार थोरवे यांनी केली.शेतकरी हा मूळ गाभा असताना २०२४ मध्ये भात हमी भावाने दिला गेलेला असताना शेकडो शेतकऱ्यांना त्यांच्या भाताचा मोबदला मिळालेला नाही हा प्रकार अतिशय चुकीचा असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी ठणकावून सांगितले.त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांनी दिलेल्या भाताचे मोबदला तत्काळ देण्यात यावा, तसचं अवकळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करा अशी सूचना आमदार थोरवे यांनी केली आहे.

झाडे ज्यावेळी शेतकऱ्यांना तुम्ही देता त्यावेळी ती झाडे उत्कृष्ट दर्जाची आहेत किंवा नाहीत याची खात्री करावी अशी सूचना केली.शेतकरी जगला पाहिजे यासाठी कृषी पर्यटनाचा चालना देण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत अशी सूचना केली.राज्याचे पर्यटन धोरण ठरविले जात असताना कर्जत तालुका पर्यटन तालुका व्हावा आणि कृषी पर्यटन तालुका व्हावा यासाठी प्रयत्न आम्ही करीत आहोत.कृषी पर्यटनाचे माध्यमातून शेतकरी जगला पाहिजे यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जाहीर केले.

भात संशोधन केंद्र सपशेल अपयशी..
कोकण कृषी विद्यापीठाचे कर्जत येथील भात संशोधन केंद्र शासन चालवते आणि या ठिकाणी शास्त्रज्ञ शेतकरी मंच स्थापन करीत नाहीत.पाच वर्षे तुम्ही मंच स्थापन करू शकले नाही आणि या ठिकाणी माझी सूचना मागील वर्षी असून देखील तुम्ही अंमलबजावणी करणार नसाल तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी बसू देणार नाही असा इशारा आमदार थोरवे यांनी कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ यांना केला.प्रगतशील शेतकरी मंच यांना पाठबळ द्या अशी सूचना करून गावोगावी ग्रामपंचायती मध्ये या योजना राबवून त्यांना शेती क्षेत्र कसे वाढेल याकडे लक्ष द्यावे अशी सूचना केली.

कर्जत मध्ये शेती राहील की नाही ही भीती.. प्रांत अधिकारी प्रकाश संकपाल
आपल्याच तालुक्यात कृषी संशोधन केंद्राचे माध्यमातून तत्काळ उपाययोजना करता येत असल्याचा मोठा फायदा होत असतो.मात्र दुसरीकडे आता शेती करणे सर्वात कठीण होऊन बसले आहे आणि त्यामुळे भविष्यात शेती राहील की नाही? अशी भीती निर्माण झाली असून आमच्या तालुक्यात शेती राहणार आहे किंवा नाही.त्यामुळे शासनाच्या योजना या लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. आता तरुण शेतकरी पुढे येत असून शेतकऱ्यांना चांगली वाण मिळाली पाहिजेत आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी अधिकारी वर्गाने घ्यावी अशी सूचना प्रांत अधिकारी यांनी केली आहे.

 

 

Web Title: Raigad news baliraja in trouble due to unseasonal rains mahendra thorve demands panchnama of damaged farms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 06:38 PM

Topics:  

  • Agriculrture News

संबंधित बातम्या

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार
1

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान
2

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई
3

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Karjat News : मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश
4

Karjat News : मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.