Raigad News: पर्यावरण प्रेमींचा स्तुत्य उपक्रम ; प्लॅस्टिकमुक्त माथेरान करण्याची शासनाकडे मागणी
माथेरान/ संतोष पेरणे: माथेरान येथील पर्यटन स्थळी पर्यटक हे जंगल भागात फिरत असतात. त्या पर्यटकांकडून आपल्याकडील प्लास्टिक बाटल्या आणि प्लास्टिक पिशव्या या जंगलात फेकून देतात.त्याच प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न माथेरान मध्ये गंभीर आहे. मात्र स्थानिक पर्यावरण प्रेमी यांनी जंगल भागात फिरून प्लस्टिक कचरा उचलण्याचा प्रयत्न केला.दरम्यान,माथेरान मध्ये शासनाने प्लास्टिक बंदी घालावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे.
माथेरान या पर्यटन स्थळी वर्षाकाठी लाखो पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. त्यातील बहुसंख्य पर्यटक हे जंगल भागात पर्यटन करताना फिरत असतात.त्या पर्यटकांच्या पायी चालत असताना बऱ्याचदा खाऊ कुरकुरे आणि पाण्याच्या बाटल्या तसेच शीतपेय यांच्या बाटल्या सोबत घेऊन जात असतात. मात्र त्याच प्लास्टिक बॉटल आणि खाऊचे रॅपर माथेरानच्या जंगल उध्वस्त होण्यास कारणीभूत ठरत आहेत. जंगलात पर्यटकांच्या माध्यमातून टाकण्यात येणारा कचरा हा या शहरातील पर्यावरण प्रेमी तरुण हे दोन तीन महिन्यांनी जंगलात जाऊन उचलत असतात. मात्र तरीही पर्यटकांकडून टाळण्यात येणारा कचरा हा कमी होण्याचे नाव घेत नाही अशी स्थितीत या निसर्गसुंदर पर्यटन स्थळाची आहे.
माथेरान हे पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असलेल्या शहरामध्ये झाडे तोडता येत नाहीत आणि कुठेही पर्यावरणाला ऱ्हास होणार नाही याची काळजी वन विभाग घेत असतात.मात्र पर्यावरण स्नेही थंड हवेच्या पर्यटक हे कचरा मुक्त पर्यटन स्थळ म्हणून पर्यटनासाठी येतात.मात्र त्याच माथेरान शहरातील जंगल भागात प्रचन्ड प्लास्टिक कचरा आढळून येत आहे.त्या कचऱ्याची विल्हेवाट माथेरान पालिका आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्या कडून त्यामुळे माथेरान शहरातील तरुणांना जंगलात जाऊन दरीमध्ये उतरून कचरा आणि प्लास्टिक बाटल्या उचलाव्या लागत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती सर्वत्र साजरी होत असताना माथेरान शहरातील पर्यावरण प्रेमी तरुण हे माथेरानच्या जंगलात प्लास्टिक कचरा उचलण्यात व्यस्त होते. या तरुणांनी जंगल भागातून तब्बल २३ बॅग भरून कचरा उचलून शहरातील गोशाळा येथे आणून टाकला आहे.
त्यामुळे शासन या पर्यटन स्थळाला वाचवेल का? असा प्रश्न परिवाराण प्रेमी तरुण राकेश कोकळे यांनी उपस्थित केला आहे.कोकळे यांनी शासनणे माथेरान मध्ये प्लास्टिक बंदी करावी अशी मागणी केली असून त्यासाठी शिवसेना पक्षाने पुढाकार घ्यावा अशी मागणी करणारे निवेदन पक्षाचे मुख्य प्रतोद ऍड मनीषा कायंदे यांची भेट घेऊन दिले आहे. माथेरान मध्ये प्लास्टिक बंदी बाबत माथेरान पालिका मागील काही वर्षे सातत्याने फलक लावून आवाहन करीत आहे. मात्र प्लास्टिक बंदी व्हावी यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करताना दिसत नाही किंवा कायद्याची मदत घेऊन अनामबजावणी करण्यात पुढे येत नाही.