१. राज्याच्या उद्योग आणि युवा मंत्री म्हणून गेल्या दोन वर्षांपासून कारभार सांभाळत आहेत. संपुर्ण अनुभव कसा होता?
महिला दिनाच्या शुभेच्छा देत आदिती तटकरे म्हणाल्या, मी खरंतर स्वत:ला भाग्यशाली समजते की, मी पहिल्यांदा विधानसभेची सदस्य २०१९ मध्ये झाली आणि महविकास आघाडी सरकारमध्ये मला राज्यमंत्री म्हणून जवळपास ८ खात्यांमध्ये काम करण्याचा अनुभव मिळतोय. क्रीडा, उद्योग, पर्यटन, युवक कल्याण, फलोत्पादन, माहिती जनसंपर्क, सगळी वेगवेगळी खाती आहेत. प्रत्येक कामाचा आवाका खूप वेगळा आहे. राज्यमंत्री म्हणून खूप नव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. प्रशासकीय ज्ञान मिळतंय. कशाप्रकारे आपण शासनाच्या योजना या विविध खात्यांमार्फत राबवू शकतो या सर्व गोष्टी एका बाजूला शिकत असताना मी जिल्हा परिषद २०१७ मध्येही सदस्य आणि अध्यक्ष म्हणून काम केलं व त्यामुळे तो ही एक अनुभव आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काम करताना मुखयमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजिदादा पवार, आदरणीय थोरात साहेब आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला पाठबळ देणार महिला सक्षमीकरणामध्ये पवार साहेबांचा सर्वात मोलाचा वाटा आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला इतक्या कमी वयामध्ये मिळणं व काम करताना महिला किंवा पुरुष असा फरक जाणवत नाही. हा एक त्याच्यातला सर्वात महत्वाचा भाग राहील.
२. महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या तुम्ही काम करत आहेत , मात्र तुम्ही राजकारणात सक्रिय २०१२ पासून आहात, युती संघटनेचा सुद्धा अध्यक्षा होता त्याबद्दल काय सांगाल..
खरंतर ज्यावेळेला माझे वडील विधानसभेचे सदस्य होते आणि मंत्री होते, तेव्हा त्यांच्या मतदारसंघात मी काम करायचे. स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यरत होती, पण खऱ्या अर्थाने आम्हाला व्यासपीठ जे दिलंय ते म्हणजेच सुप्रिया ताईने, म्हणजे राष्ट्रवादी युवा संघटना जी त्यांनी २०१२ सली स्थापन केली व याच्यामध्ये राज्यातल्या काही तरुणींना एक हक्काचं व्यासपीठ मिळालं. त्यावेळेस ती युवतींसठी असलेली एकमेव संघटना होती. अश्या पद्धतीच्या संघटनेच्या माध्यमातून आमचे प्रश्न मांडण्याचा, त्याचबरोबर राजकारणाला किंवा या क्षेत्राला जवळून बघण्याचा एक प्लॅटफॉर्म आम्हाला मिळाला. कारण, एका बाजूला कुटूंब म्हणून पार्श्वभूमी असते, पण ज्यावेळेला आपण संघटनेमध्ये काम करतो त्यावेळेला राज्यातल्या आपापल्या भागातून ज्या युवती आणि युवक असतात त्यांच्यासोबत आपल्याला संवाद साधण्याची संधी मिळते व त्यातून खुप शिकायला मिळतं. त्यामुळे ती एक बाब माझ्या राजकीय जीवनामधे किंवा राजकारणामध्ये येण्याच्या आधी सर्वात महत्वाची बाब होती.
३. महिला राजकारणा येणायची संख्या वाढली आहे. जरी आपण महिलांना ३३ टक्के आरक्षण म्हटलं तरी पण अनेक स्थानिक पातळीवर महिला मागून पुरुष काम करत असतात. तुम्ही महिला मंत्री म्हणून कसे बघतात ?
खरंतर सुरुवातीला आपण बघितल की, महिला सक्षमीकरणाचा विषय आला होता त्यावेळेस ३३% आरक्षण होत. सुदैवाने नंतर आदरणीय पवार साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र पाहिलं राज्य होत, ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ५०% आरक्षण महिलांना दिलंय. प्रॅक्टिकली बघितल तर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असते तेव्हा ५०% आणि काही ठिकाणी ५१% महिलांना संधी मिळते व ही खूप महत्त्वाची बाब आहे. काम करत असताना ज्यावेळेला आरक्षण पडतं त्यावेळेला एका स्त्रीचं आयुष्य तिच्या एका परिवाराभोवती, तिच्या घरातल्या जबाबदाऱ्या किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात. बऱ्याचदा महिलांसाठी एक टिपिकल वाक्य असतं ‘चूल आणि मूल’ तर यामध्ये ती अडकलेली असते. पहिल्यांदा जेव्हा तिला आरक्षणातून संधी मिळते, त्यावेळेला तिला शिकायला थोडा कालावधी जातो व हे स्वाभाविक आहे, खासकर ग्रामीण भागामध्ये व दुर्गम भागामध्ये. ज्यांनी खऱ्या अर्थाने शासकीय प्रपंच किंवा कामकाज बघितलेलं नसतं मग अश्या वेळेला पहिल्या कार्यकाळात त्यांना घरातले जे पुरुष मंडळी आहेत ते त्यांना थोडफार सहकार्य करतात. पण मला प्रामाणिकपणे असं वाटत की, एखाद्या महिलेला जर राजकरणात पुढे जायचं असेल, सक्रिय राहायचं असेल किंवा एखाद्या वेळेला ती सरपंच झाली असेल आणि व पुढे तिला पंचायत समिती सदस्य व्हायचं असेल तर त्यांनी स्वतः तो एकंदर कारभार, शासकीय ज्ञान शिकणं फार महत्वाचं आहे. एखाद्या महिलेला हे वाटलं की, कदाचित आपण एवढं सुशिक्षित नाही पण प्रशासन जर आपण तितक्या चिकाटीने शिकलो तर मला वाटतं आपण त्या क्षणिक पात्रतेपेक्षाही चांगल्या पद्धतीने टिकू शकतो. जनसेवा करण्याची भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. ती भावना असली म्हणजेच आपण एक महिला म्हणून चांगल काम करू शकतो.
अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ज्या घरामध्ये मी जन्माला आले, तिथे माझा एक मोठा भाऊ आहे, तो विधानपरिषद आमदार आहे. मी त्याच्या आधी निवडणूक लढवली. मी जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली नंतर विधानसभेची सदस्यही झाली. मी ज्या घरात जन्माला आली तिथे कधी दूजाभाव झाला नाही ते एक सुदैव आहे. मी ज्या पक्षामध्ये काम करते तिथे महिलांना खूप चांगली संधी दिली जाते. पहिल्यांदा विधानसभा सदस्य होऊन पण मला एक महिलामंत्री म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. महिला मंत्री म्हणून प्रतिनिधित्व करत असताना मला कुठल्या टिपिकल खात्यांच्या कारभार दिला नाही. कारभार सांभाळताना कॅबिनेट मत्र्यांच देखील मार्गदर्शन महत्वाचं असतं, ते ही मला मिळत गेलं. त्यामुळे मी नेहमीच म्हणत असते की, आपण किती चिकाटीने काम करतो याच्यावर सगळ अवलंबून राहत. आपण एकदा चांगल्या पद्धतीने काम करत राहिलो की, मग तो जो फरक आहे त्याकडे कालांतराने सगले दुर्लक्ष करतात.
४. राज्यात जर पाहिले तर विविध माध्यमातून महिलासाठी काम करण्याची गरज आहेत. तुमचाकडे उद्योग विभाग आहे. महिलांसाठी उद्योग विभागामार्फत काही योजना आहेत का ?
उद्योग विभागामार्फत महिलांसाठी खूप साऱ्या योजना आहेत. ज्याच्यामध्ये समजा जर एक उद्योजिका असेल, व्यवसाय एखादा सुरू करायचा असेल तर त्यांना अतिरिक्त पैसे चांगल्या प्रकारे मिळतात. त्यांना प्राधान्य दिल जाते. त्यांना सवलत दिली जाते. या व्यतिरिक्त कृषी आणि फलोत्पादन विभागाने गेल्या वर्षीच मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवी पुष्कळणी, रोपवाटिका योजना केल्या व या योजनेमध्ये त्यांनी महिला शेतकरी किंवा महिला बागायतदारांना विशेष सवलत दिली. त्यामध्ये ज्या काही अटी आणि नियम आहेत त्या यांच्यासाठी शिथिल करण्यात आल्या. असेच प्रत्येक खात्यांमध्ये महिलांसाठी बऱ्याच सवलती आहेत. त्याचा प्रसार होणे आणि महिलांनी जास्त लाभ घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा शासनाच्या ज्या योजना आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचत नाही पण हल्ली सुदैवाने ग्रामीण भागातील महिला पण शहरी भागातील महिलांसारखे स्मार्ट फोन वापरतात. त्यातूनही त्यांना खूप गोष्टी कळतात. इंटरनेट असेल किंवा सोशल मीडिया असेल त्याचा वापर हल्ली महिलाही करत असल्यामुळे जागरूकता जास्त प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते.
५. वडीलानंतर तुम्ही सुद्धा राजकारणात आल्या. राजकारण सेवा आहे की वारसा आह ?
वारसा हा मिळालेला असतो. तेव्हा कळण्याची वृत्ती आपल्यामध्ये असणे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण निवडणूक लढवताना आपण वारसमुळे निवडून येऊ. आपण त्याचा कशा पद्धतीने वापर करतो याच्यावर पुढची प्रगती अवलंबून असते. त्यामुळे वारसा हा दोन्ही बाजूंनी आहे. ती एक मोठी जबाबदारी पण आहे व त्याच बरोबर हल्लीच्या कालावधीमध्ये राजकीय घराण्याला एका नकारात्मक प्रकारे पण बघितल्या जाते. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यशाली समजते. मी राजकीय घरात जन्माला आली व सुदैवाने माझी वृत्ती पण जनसेवा करण्याची झाली. त्या संधीचा जितका होऊ शकेल, तितका मी उपयोग करण्याचा प्रयत्न करते. आपण कुठल्या दृष्टीकोनातून एखाद्या गोष्टीकडे कसे बघतो हे जास्त महत्वाचं आहे.
६. महिला दिवसानिमित्य महिलांना काय संदेश द्याल..?
महिला होण्याचा जो काही अभिमान आहे, तो एक दिवसाचा नसून तो आयुष्यभर असतो. महिलांनी सक्षम होण्यासाठी स्वत:वर विश्वास असणं महत्वाचं आहे. जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर नक्कीच सकारात्मक गोष्टी घडतील.