Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनसेच्या उमेदवाराचा हलगर्जीपणा नडला, वेळेत न पोहोचल्याने अर्ज दाखल करून घेण्यास नकार

उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने अनेक ठिकाणी उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या. एका मतदारसंघात वेळेत न पोहचल्याने मनसे उमेदवाराला अर्ज न भरण्याची नामुष्की ओढावली.

  • By नारायण परब
Updated On: Oct 29, 2024 | 08:45 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/ संतोष पेरणे: कर्जत विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्या निर्धारित वेळेत नामांकन अर्ज भरता आला नाही.नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत संपलेली असताना मनसेचे अधिकृत उमेदवार जनार्दन परशुराम पाटील यांना अर्ज न भरताच परतावे लागले.दरम्यान,काही काळ थांबून मनसेचे कार्यकर्ते हात हलवत परतावे लागल्याने मनसैनिक नाराज झाले.

हे देखील वाचा- शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अंबरनाथमध्ये कोण मारणार बाजी? ठाकरे शिंदे गटात होणार काटे की टक्कर

प्रशासनाने दिल्या वेळेसंबंधी सूचना

कर्जत मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नामांकन अर्ज दाखल करण्यास पाच मिनिटे शिल्लक असून आणि त्यानंतर पुन्हा एकदा कार्यालयाचे बाहेर येवून तीन वाजले असल्याचे जाहीर करीत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय जाधव यांनी ध्वनिक्षेपक वरून मुदत संपली असल्याचे जाहीर केले.त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे दार आतमधून बंद करण्यात आले.त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात दोन अपक्ष उमेदवार हे नामांकन अर्ज भरण्यासाठी हजर होते.

वेळ संपल्याने अर्ज स्वीकारता येणार नाही

साधारण तीन वाजून तीन मिनिटांनी मनसेचे कार्यकर्ते हे उमेदवार जनार्दन परशुराम पाटील यांच्यासह जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील तसेच अन्य कार्यकर्ते हे तेथे पोहचले.मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनाबाहेर असलेले पोलीस यांनी मुदत संपल्याने दालन बंद झाले असल्याचे सांगितले.त्यावेळी मनसेचे उमेदवार पाटील आणि जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेण्याची मागणी केली.मात्र अर्ध्या तासांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ यांचा निरोप असून वेळ संपल्याने अर्ज स्वीकारता येणार नाही असे जाहीर केले.त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते हे नामांकन अर्ज न भरता परत फिरले.

हे देखील वाचा- भाजपच्या मुंबईतील गडाला हादरा ! बोरीवलीतून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी सादर केला अपक्ष उमेदवारी अर्ज

मनसेने नामांकन अर्ज भरण्यासाठी मुद्दामहून उशीर केला काय?

मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन परशुराम पाटील यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पक्षाचा ए बी फॉर्म देखील देण्यात आला होता.मात्र नामांकन अर्ज भरायला वेळेवर पोहचले नसल्याने मनसेचा उमेदवार या निवडणुकीत दिसणार नाही.मात्र मनसेने नामांकन अर्ज भरण्यासाठी मुद्दामहून उशीर केला काय?यामागे काही राजकारण आहे काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

कर्जतमध्ये तिरंगी लढत

कर्जत मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेश थोरवे विरुद्ध ठाकरें गटाचे उमेदवार नितीन सावंत यांच्यात प्रमुख लढत होणार आहे मात्र अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन ही लढत तिरंगी केली आहे. या निवडणूकीत कोणती शिवसेना बाजी मारते की अनपेक्षितपणे अपक्षाचा विजय होतो हे पाहणे औत्सुकाचे असणार आहे.

 

Web Title: The administration refused to fill the application due to the mns candidates laziness not arriving in time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 08:32 PM

Topics:  

  • Karjat
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Karjat : कर्जत ताडवाडीतील ड्रग्स कारखान्यावर गावकऱ्यांची धाड, 5 जण अटकेत
1

Karjat : कर्जत ताडवाडीतील ड्रग्स कारखान्यावर गावकऱ्यांची धाड, 5 जण अटकेत

विद्यार्थ्यांसाठी समाज संघटना वसतिगृह आणि स्पर्धा परीक्षासाठी अभ्यासिका उभारण्याचा संकल्प- संजय पाटील
2

विद्यार्थ्यांसाठी समाज संघटना वसतिगृह आणि स्पर्धा परीक्षासाठी अभ्यासिका उभारण्याचा संकल्प- संजय पाटील

Karjat Crime News : कर्जतमध्ये वाढतेय गुन्हेगारी प्रवृत्ती ? स्थानिक पत्रकारावर जीवघेणा हल्ला
3

Karjat Crime News : कर्जतमध्ये वाढतेय गुन्हेगारी प्रवृत्ती ? स्थानिक पत्रकारावर जीवघेणा हल्ला

KARJAT :धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून कर्जत पोलिसांना बॅरिकेट्स भेट
4

KARJAT :धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून कर्जत पोलिसांना बॅरिकेट्स भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.