
कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रातील कोल्हारे, धामोते परिसरातील शासकिय जमिनीवर सर्व अतिक्रमण,अनाधिकृत बांधकामे काढून टाकणे आदी विषयांवर नेरळ कळंब रस्त्यावरील साई मंदिर चौक येथे उपोषण सुरू केले आहे.या उपोषणाला स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष,भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ठाकरे पक्षाने पाठिंबा दिला आहे. विजय हजारे यांनी आपल्या उपोषणात विविध 12 विषयांवर विविध शासकीय विभागातीप अधिकारी वर्ग यांच्याकडून न्यायाची मागणी केली आहे.त्यात नेरळ ग्रामपंचायत हद्दीत बांधण्यात आलेल्या राजिप वाणिज्य संकुल व विश्रामगृह इमारत खुली करण्यात यावी व इमारतीत बांधलेले गाळे वाटप करण्यात यावेत.
उद्घाटन होऊन 4 वर्षे झाली तरी गाळे वाटप का करण्यात आले नाही ? कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील अनाधिकृत इमारतीमध्ये सुरु असलेल्या शाळेची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील डिस्कव्हर रिसॉर्टची थकित घरपट्टी वसुल करावी. कोल्हारे ग्रामपंचायत कार्यालयाच्या दुरुस्तीच्या कामाची मुदत संपून गेली तरी काम पूर्ण झालेले नाही. त्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी. धामोते येथील भाडयाच्या गाळ्यात सुरु असलेले ग्रामपंचायत कार्यालय कोल्हारे येथील मुख्य कार्यालयात सुरु करावे.कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रातील मौजे धामोते हद्दीतील साईबाबा मंदिर ते द मॉर्निंग बिल्डिंग ते ब्रिज पर्यंत डीपी रस्त्याची मोजणी करून पेशवाई मार्गावर डीपी रस्त्यावर झालेली सर्व अतिक्रमणे, अनाधिकृत बांधकामे काढून टाकावी.
त्याचवेळी कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच यांनी पदाचा दुरुपयोग करून बांधकाम ना हरकत दाखले दिले, बिल्डिंगला पूर्णत्वाचा दाखला दिला. 18 जुलै 2016 च्या शासन निर्णयाचा आधार घेऊन दुसऱ्याच्या जागेत मनमानी करुन कर आकारणी केली. याची सखोल चौकशी करून सरपंच व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. कोल्हारे ग्रामपंचायतीचे पूर्ण दप्तर तपासणी करावी.कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते येथील खुले गावठाण सर्व्हे नं. 1/1 या जागेची मोजणी करुन खुले गावठाण जागतेली 2011 पूर्वीच्या घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे. धामोते येथील खुले गावठाण जागेत जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेता 2011 नंतर करण्यात आलेली सर्व अतिक्रमणे, अनाधिकृत बांधकामे काढून टाकणे.
कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील कोल्हारे येथील सर्व्हे नं.74/5 या प्रमुख रस्त्याच्या जागेची शासकिय मोजणी करून रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे व रस्त्यालगत असलेल्या नाल्याला संरक्षक भिंत बांधणे.कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ धामोते बस स्टॉप रस्त्याला संरक्षक भिंत बांधणे. कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते, बोपेले, कोल्हारे येथील नेरळ-कळंब राज्यमार्ग ते हजारे नगर मुख्य रस्त्यापर्यंत असलेल्या 60 फुटी डीपी रस्त्याची मोजणी करून रस्त्यावरील सर्व अक्रिमण, अनाधिकृत बांधकामे काढून टाकावी. कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ-कळंब राज्यमार्ग, नेरळ-बोपेले प्रमुख जिल्हामार्ग, तसेच कोल्हारे, बोपेले, धामोते हद्दीतील नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रातील अतिक्रमण, अनाधिकृत बांधकामांना दिलेल्या नोटियांसहीत अतिक्रमण, अनाधिकृत बांधकामांची पूर्ण यादी मिळावी अशी मागणी केली आहे.