Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यासह परिसराला मुसळधार पावसाने झोडपले; हवामान विभागाने म्हटलं, ‘पुढील सहा दिवस…’

राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यात दिवसभराच्या उकाड्यानंतर दुपारनंतर आभाळ ढगाळ होऊन पावसाला सुरुवात झाली. याचबरोबर जोरदार वारेही वाहत होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 21, 2025 | 08:31 AM
पुण्यासह परिसराला मुसळधार पावसाने झोडपले; हवामान विभागाने म्हटलं, 'पुढील सहा दिवस...'

पुण्यासह परिसराला मुसळधार पावसाने झोडपले; हवामान विभागाने म्हटलं, 'पुढील सहा दिवस...'

Follow Us
Follow Us:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. दिवसा उन्ह तर नंतर पावसाचे आगमन होताना दिसत आहे. मंगळवारी पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले. शहरात दुपारनंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. जोरदार वाऱ्यांमुळे काही ठिकाणी झाडे पडली तर, सखल भागांत निचरा न झाल्याने पाणी साठून राहिले होते.

पुणे वेधशाळेने हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पुढील सहा दिवस आकाश ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यात दिवसभराच्या उकाड्यानंतर दुपारनंतर आभाळ ढगाळ होऊन पावसाला सुरुवात झाली. याचबरोबर जोरदार वारेही वाहत होते. पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहू लागले. पाण्याचा निचरा न झाल्याने महापालिकेने केलेल्या पावसाळी गटारांच्या सफाईच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्वेनगर, चांदणी चौक आदी ठिकाणी रस्त्यावर पाण्याचे तळेच साचले होते. पुणे वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पुढील सहा दिवस पुणे शहर आणि परिसरात आभाळ ढगाळ राहणार आहे. संध्याकाळी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. मंगळवारी सांयकाळी सहा वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ७ मिमी, पाषाण येथे २६ मिमी, लोहगाव येथे ५.८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.

अचानक आलेल्या पावसामुळे नुकसान

बुलडाण्यात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांची टिन पत्र उडाली तर काही घरांच्या भिंती कोसळल्या झाडे कोलमडली. यामध्ये सहा जण जखमी झाले असून, 2 जण गंभीर जखमी झाले आहे.

देऊळगावराजात वादळी वाऱ्यासह पाऊस

देऊळगाव राजा तालुक्यात मंगळवारी (दि. 20) दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. यामध्ये अनेक जणांचे घरावरचे टिन पत्र उडाली तर काहींच्या भीती कोसळल्या. दगडवाडी फाट्यावर असलेल्या वाटिका हॉटेलवरचे टिन पत्र उडाले. अशातच टिन पत्र उडून भिंत कोसळली. विटांचा व दगडांचा मारा लागून 6 जण जखमी झाले.

Web Title: Rain forecast for the next six days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 08:31 AM

Topics:  

  • Climate Change
  • maharashtra rain news
  • Maharashtra Weather

संबंधित बातम्या

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार
1

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
2

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा
3

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
4

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.