Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील अनेक भागांत पावसाची अद्याप प्रतीक्षाच; खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत

पावसाचे आगमन उशिरा झाल्याने जिल्ह्यात खरिपाची पेरणी मूळात उशिरा म्हणजे जूनच्या अखेरीस सुरू झाली होती. वेळ वाया जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी अल्प ओलाव्यावरच पेरण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 10, 2025 | 07:26 AM
राज्यातील अनेक भागांत पावसाची अद्याप प्रतीक्षाच; खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत

राज्यातील अनेक भागांत पावसाची अद्याप प्रतीक्षाच; खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत

Follow Us
Close
Follow Us:

जळगाव : राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळत आहे. त्यात ऑगस्ट महिना सुरू झाला तरी जिल्ह्यात अद्याप कुठेच शेतांमधून पाणी वाहून निघालेले नाही. त्यात आता पावसाने गेल्या १५ दिवसांपासून दडी मारली आहे. अशा स्थितीत, फुलोरा व शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या बहुतेक सर्व पिकांची खूपच नाजूक अवस्था झाली आहे. दुपारच्या वेळी पिके ऊन धरू लागल्याने खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पावसाचे आगमन उशिरा झाल्याने जिल्ह्यात खरिपाची पेरणी मूळात उशिरा म्हणजे जूनच्या अखेरीस सुरू झाली होती. वेळ वाया जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी अल्प ओलाव्यावरच पेरण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिकांच्या वाढीसाठी पावसाची गरज असताना गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने अल्प ओलाव्यावर उगवलेली पिके आता नाजूक स्थितीत पोहोचली आहेत. पुरेसा पाऊस न पडल्याने आणि रासायनिक खतांचा डोस देण्यासारखी कामेही तात्पुरती थांबवली आहेत.

दमदार पावसाअभावी वाढीच्या तसेच फुलोरा व शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. दमदार पावसाअभावी नदी व नाले अजूनही वाहताना दिसलेले नाहीत. विहिरींसह कूपनलिकांच्या पाणी पातळीतही वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागत आहे. त्यासाठी बरेच शेतकरी ठिबक, तुषार सिंचनावर भर देत आहेत. पाण्याची कोणतीच सोय नसलेल्या शेतकऱ्यांवर मात्र आभाळाकडे पाहण्याची वेळ आली आहे

जळगावातील पाच तालुक्यांत पावसाची मोठी तूट

कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात जून ते सप्टेंबरच्या कालावधीत सरासरी ६३२.६ मिलीमीटर पाऊस पडतो. प्रत्यक्षात, आठ ऑगस्टअखेर सरासरी २४६.८ मिलीमीटर (३९ टक्के) इतकाच पाऊस पडला आहे. त्यातही १५ पैकी पाच तालुक्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. ज्यामध्ये रावेर, यावल, अमळनेर, चोपडा आणि धरणगाव या तालुक्यांचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यांतही पावसाची फार समाधानकारक स्थिती नाही.

तापमान वाढीचा पिकांना फटका बसण्याची शक्यता

जुलैअखेरपर्यंत पावसाची थोडीफार रिमझिम सुरू राहिल्याने खरीप पिके तग धरून तरी उभी होती. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर तापमानाचा पारा वाढल्याने खरीप पिके आता ऊन धरू लागली आहेत. दोन-तीन दिवसात पाऊस न पडल्यास कपाशी, मका, सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी या पिकांना मोठा फटका बसण्याची तसेच उत्पादनात घट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी आंतरमशागतीसह कीटकनाशकांची फवारणी आणि रासायनिक खतांचा डोस देण्यासारखी कामेही तात्पुरती थांबवली आहेत.

Web Title: Rain is still awaited in many parts of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 07:21 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • Maharashtra Weather
  • Rain News

संबंधित बातम्या

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪
1

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू
2

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी
3

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Mumbai Rain Update :  ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन
4

Mumbai Rain Update : ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.