Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीवर पावसाचे सावट! ‘या’ जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता, IMD कडून यलो अलर्ट

गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात गारवा वाढत गुलाबी थंडी पडू लागली आहे. मात्र, दाना चक्रीवादळाचा फटका ओडिशाच्या किनारपट्टीला बसल्यावर हवेतील बाष्प पश्चिमेकडे वळले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 28, 2024 | 09:12 AM
या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता, IMD कडून यलो अलर्ट (फोटो सौजन्य-X)

या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता, IMD कडून यलो अलर्ट (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांत बाष्पाचे प्रमाण कमी होऊन हवामान कोरडे झाल्यामुळे पात्री आणि पहाटे गारवा जाणवू लागला आहे. तर दूसरीकडे दाना चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला आदळल्यानंतर हवेतील बाष्प पश्चिमेकडे येत आहेत. त्यामुळे ऐन दिवाळी सणावर पावसाचे सावट असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात गारवा वाढत गुलाबी थंडी पडू लागली आहे. वातावरणाची हीच स्थिती पावसासाठी पुरक आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीनंतर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन-तीन दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

मोसमी वाऱ्यांनी माघार घेतल्यानंतरच राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडतो. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र यामुळे भारताच्या राज्यात ठीकठीकाणी पाऊस पडला. गेल्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यानंतर तापमानात वाढ होऊन काही ठिकाणी ‘ऑक्टोबर हिट’ जाणवेल. मात्र, 29 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यात परतीचा पाऊस चांगलाच लांबला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली असली तरी राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती असे असले तरी ऑक्टोबर हीटचा चटका देखील अनुभवयास मिळला. त्यात आता पुन्हा पावसाचे सावट निर्माण झाले आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

एकीकडे गुलाबी थंडीचा जोर वाढत असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. त्यानुसार येत्या दोन-तीन दिवसांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार राज्यात २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, गडचिरोली, गोंदिया, अहिल्यानगर, पुणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, जालना, भंडारा या जिल्ह्यात तुरळक ठीकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर 31 ऑक्टोबरला यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यात वादळी वारा, वीजांचा कडकडाटासह पावसाची हजेरी लागू शकते. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतरत्र हवामान सामान्यतः कोरडे राहण्याची शक्यता आहे.

आज, 28 ऑक्टोबरपासून पावसाची शक्यता आहे. आकाश ढगाळ होईल आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून हवेतील बाष्प नसल्यामुळे वातावरण कोरडे झाले होते. त्यामुळे गरव्याची चाहूल सुरू झाली. केवळ चक्रीवादळानंतर हवेतून येणारी बाष्प पश्चिमेकडे येते. त्यामुळे दिवाळीदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

Web Title: Rain on diwali 2024 imd issues yellow alert for thunderstorms likely in these districts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 09:12 AM

Topics:  

  • Diwali

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.