Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivaji Park : ‘जब दीप जले आना’च्या सुरांनी रंगली दिवाळी संध्या; राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक पत्कींचा सन्मान

Shivaji Park : शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे आयोजित ‘जब दीप जले आना’ दिवाळी संध्या संगीत मैफलीत नचिकेत देसाई, माधुरी करमरकर आणि केतकी भावे-जोशी यांनी सदाबहार गीते सादर केली. राज ठाकरे यांच्या हस्ते ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा सन्मान करण्यात आला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 01, 2026 | 09:27 PM
Raj Thackeray : 'जब दीप जले आना'च्या सुरांनी रंगली दिवाळी संध्या; राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक पत्कींचा सन्मान

Raj Thackeray : 'जब दीप जले आना'च्या सुरांनी रंगली दिवाळी संध्या; राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक पत्कींचा सन्मान

Follow Us
Follow Us:
  • जुन्या गाण्यांच्या आठवणींना उजाळा
  • मैफलीत सुप्रसिद्ध गायकांचा समावेश
  • उल्लेखनीय योगदानाबद्दल पत्की यांचा सन्मान
शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे (SPG) (Shivaji Park) आयोजित ‘जब दीप जले आना’ या दिवाळी संध्या या विशेष संगीत मैफलीत हिंदी आणि मराठी सदाबहार गीतांचा सुरेल नजराणा रसिकांना अनुभवायला मिळाला. शनिवार, 31 ऑक्टोबर रोजी दादर येथील शिवाजी पार्क जिमखान्याच्या परिसरात हा कार्यक्रम पार पडला. तब्बल तीन तास रंगलेल्या या मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

जुन्या गाण्यांच्या आठवणींना उजाळा

या संगीत मैफलीत सुप्रसिद्ध गायक नचिकेत देसाई, माधुरी करमरकर आणि केतकी भावे-जोशी यांनी लोकप्रिय हिंदी आणि मराठी गीते सादर केली. त्यांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. जुन्या गाण्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या संगीतप्रवासाचा रसिकांनी मनमुराद आनंद लुटला.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन, सुयोग्य व्यवस्था आणि एकूणच आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरेश साने यांनी केले.

मोठी बातमी ! खर्च तिप्पट झाल्यास मंत्रिमंडळ मंजुरी बंधनकारक; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीही महत्त्वपूर्ण

राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक पत्की यांचा गौरव

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ज्येष्ठ संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांचा करण्यात आलेला विशेष सत्कार. शिवाजी पार्क जिमखान्याचे सदस्य असलेल्या पत्की यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी, दूरचित्रवाणी आणि जाहिरात क्षेत्रातील संगीतासाठी अशोक पत्की यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये राज ठाकरे, माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे आणि लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी यांच्यासह शिवाजी पार्क जिमखान्याचे अनेक सदस्य सहभागी झाले होते. दरम्यान, शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने दरवर्षी दिवाळीच्या आधी व दिवाळीच्या काळात विविध उपक्रम राबवले जातात. शिवाजी पार्क जिमखान्याचे अनेक मान्यवर  मंडळी ही सदस्य देखील आहेत.

एसटीच्या NCMC कार्ड सवलतीच्या नावाखाली प्रवाशांची लूट; श्रीरंग बरगे यांचा संतप्त आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘जब दीप जले आना’ दिवाळी संध्या कार्यक्रमाचे आयोजन कोणी केले?

    Ans: शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे (SPG) या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

  • Que: या कार्यक्रमात कोणत्या गायकांनी गाणी सादर केली?

    Ans: नचिकेत देसाई, माधुरी करमरकर आणि केतकी भावे-जोशी यांनी हिंदी आणि मराठी सदाबहार गीते सादर केली.

  • Que: अशोक पत्की यांचा कोणत्या योगदानाबद्दल गौरव करण्यात आला?

    Ans: मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी आणि जाहिरात क्षेत्रातील संगीतासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

Web Title: Raj thackeray shivaji park gymkhana jab deep jale aana diwali sandhya rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 09:27 PM

Topics:  

  • Diwali
  • Raj thakcreay
  • Shivaji Park

संबंधित बातम्या

Vasubaras 2026: वसुबारस साजरी करण्याची पद्धत प्रत्येक राज्यात वेगळी; जाणून घ्या देशभरातील खास परंपरा
1

Vasubaras 2026: वसुबारस साजरी करण्याची पद्धत प्रत्येक राज्यात वेगळी; जाणून घ्या देशभरातील खास परंपरा

Diet Control: दिवाळीत वजन नियंत्रणासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? तज्ज्ञांनी दिला सल्ला
2

Diet Control: दिवाळीत वजन नियंत्रणासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? तज्ज्ञांनी दिला सल्ला

Bank Holidays November 2026 : सणासुदीत महत्त्वाची कामे खोळंबणार? धनतेरस, दिवाळीनिमित्त बँका कधी बंद असणार; पाहा सुट्ट्यांची यादी
3

Bank Holidays November 2026 : सणासुदीत महत्त्वाची कामे खोळंबणार? धनतेरस, दिवाळीनिमित्त बँका कधी बंद असणार; पाहा सुट्ट्यांची यादी

Diwali 2026: धनत्रयोदशीला वही खरेदी, लक्ष्मीपूजनाला चोपडी पूजन; काय आहे परंपरेमागील धार्मिक महत्त्व
4

Diwali 2026: धनत्रयोदशीला वही खरेदी, लक्ष्मीपूजनाला चोपडी पूजन; काय आहे परंपरेमागील धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.