Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात पावसाचा जल्लोष, सोलापुरात काळे ढग अन् कोरडी जमीन; शेतकऱ्यांच्या नजरा अजूनही आभाळाकडे

पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे दौंड नदी मापन केंद्रातून मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल १ लाख ५६ हजार १८७ क्युसेक्स वेगाने पाणी उजनी धरणात दाखल होत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 07, 2026 | 08:43 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

 

पंढरपूर | शिवाजी हळणवर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा थेट आणि सकारात्मक परिणाम आता उजनी धरणावर दिसू लागला आहे. मंगळवार (७ जुलै) सायंकाळी ६ वाजेपर्यंत दौंड नदी मापन केंद्रातून तब्बल १ लाख ५६ हजार १८७ क्युसेक्स वेगाने पाणी उजनी धरणात दाखल होत असून, धरणातील पाणीसाठ्यात तासागणिक मोठी वाढ होत आहे. त्यामुळे उजनी धरण आता ‘डेड स्टोरेज’मधून बाहेर पडून ‘प्लस’मध्ये जाण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे.

Maharashtra Rain Alert: पुण्यावर आभाळ फाटलं! लोणावळ्यात तब्बल १२९० मिमी…; उद्या हाहाकार

सायंकाळी ६ वाजेपर्यंत उजनी धरणाची जलपातळी ४९०.३५० मीटर इतकी नोंदविण्यात आली. धरणातील एकूण पाणीसाठा १६७२.७६ दशलक्ष घनमीटर (५९.०७ टीएमसी) झाला असून, उपयुक्त पाणीसाठा अद्याप उणे १३०.०५ दशलक्ष घनमीटर (-४.५९ टीएमसी) म्हणजेच उणे ८.५७ टक्के आहे. धरणाचे जलव्याप्ती क्षेत्रही वाढून १८५.०७ चौ.कि.मी. इतके झाले आहे.

दौंडहून येणाऱ्या प्रचंड पाण्याच्या लोंढ्यामुळे उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. पुणे जिल्ह्यात आणखी एक-दोन दिवस असाच दमदार पाऊस सुरू राहिल्यास उजनी धरण उद्यापर्यंत ‘प्लस’मध्ये येण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.मात्र, या आनंदाच्या बातमीला एक वेगळीच वेदनेची किनार आहे. ज्या सोलापूर जिल्ह्याचे जीवन उजनीवर अवलंबून आहे, त्याच जिल्ह्यात पावसाने अजूनही पाठ फिरवली आहे. दिवसभर सुसाट वारे, आकाशात दाटलेले काळेकुट्ट ढग आणि तरीही पावसाचा एक थेंब नाही, अशी स्थिती अनेक भागांत पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्याप रखडल्या आहेत, तर काहींनी मोठ्या धाडसाने केलेल्या पेरण्या आता पावसाअभावी धोक्यात आल्या आहेत. उगवलेल्या पिकांना जीवदान देण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात एकीकडे उजनी भरत असल्याचा आनंद असला, तरी दुसरीकडे स्वतःच्या शिवाराकडे पाहताना काळजी अधिक वाढत आहे.

रायगडमध्ये अतिवृष्टीचा कहर ! ४ जणांचा मृत्यू, ९ जखमी, १,०३२ नागरिकांचे स्थलांतर

उजनी भरतेय ही आनंदाची बाब आहे, पण आमच्या शेतात दोन सरी पाऊस पडल्याशिवाय हा आनंद पूर्ण होणार नाही, अशी भावना अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. काही जण तर धरण भरतंय… पण आमचं शिवार अजूनही तहानलेलं आहे,अशा शब्दांत आपल्या मनातील व्यथा मांडत आहेत. उजनीतील वाढता पाणीसाठा भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिंचन आणि रब्बी हंगामासाठी मोठा दिलासा देणारा ठरणार असला, तरी खरी गरज आज खरीप पिकांसाठी वेळेवर पडणाऱ्या पावसाची आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरा आता आकाशाकडे खिळल्या आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली असली, तरी शेतकऱ्यांची एकच प्रार्थना आहे.उजनीत पाणी वाढतच राहो आणि त्याचवेळी सोलापूरच्या शिवारावरही वरुणराजाची कृपादृष्टी होवो. कारण धरण भरल्याने भविष्यातील तहान भागेल; पण आजच्या पिकांना वाचवण्यासाठी आकाशातून पडणारा पाऊसच सर्वात मोठा आधार आहे.

Web Title: Rain revelry in pune dark clouds and parched land in solapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 08:43 PM

Topics:  

  • pandharpur

संबंधित बातम्या

विठुरायाच्या वारीत आता आकाशातूनही आरोग्यसेवा; अत्यावश्यक रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
1

विठुरायाच्या वारीत आता आकाशातूनही आरोग्यसेवा; अत्यावश्यक रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

देहूनगर पंचायत पालखी सोहळ्यासाठी सज्ज; चाळीस कॅमेऱ्यांची नजर
2

देहूनगर पंचायत पालखी सोहळ्यासाठी सज्ज; चाळीस कॅमेऱ्यांची नजर

‘मुदत संपली तरी खुर्ची कायम, विठ्ठल मंदिर समिती बरखास्त करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे श्रीकांत शिंदे यांची मागणी
3

‘मुदत संपली तरी खुर्ची कायम, विठ्ठल मंदिर समिती बरखास्त करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे श्रीकांत शिंदे यांची मागणी

Ashadhi Wari 2026 : लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेची इंद्रायणी प्रदूषणाच्या विळख्यात; केमिकलयुक्त प्रदूषणामुळे वारकऱ्यांची चिंता वाढली
4

Ashadhi Wari 2026 : लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेची इंद्रायणी प्रदूषणाच्या विळख्यात; केमिकलयुक्त प्रदूषणामुळे वारकऱ्यांची चिंता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.