Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur: आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्राही गाजणार! पालकमंत्री जयकुमार गोरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; खड्डे, प्रदक्षिणा मार्ग अन् स्वच्छतेस

Jaykumar Gore on Pandharpur Kartiki Yatra Planning: पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आषाढी यात्रेच्या धर्तीवर कार्तिकी यात्रेचे नियोजन करण्याची ग्वाही देत भाविकांच्या सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे स्पष्ट केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 09, 2026 | 08:25 PM
Jaykumar Gore on Pandharpur Kartiki Yatra

Jaykumar Gore on Pandharpur Kartiki Yatra

Follow Us
Follow Us:
  • आषाढीचा पॅटर्न कार्तिकी यात्रेतही
  • भाविकांसाठी पंढरपुरात सुविधांचा मास्टर प्लॅन
  • खड्डे बुजवण्यापासून स्वच्छतेपर्यंत सूचना
पंढरपूर : आषाढी यात्रेच्या धर्तीवर कार्तिकी यात्रेचेही नियोजन करण्यात येणार असून, भाविकांच्या सुविधांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. शहरातील रस्त्यांवरील खड्डे, प्रदक्षिणा मार्गाची दुरुस्ती, चंद्रभागा नदी परिसराची स्वच्छता आणि ६५ एकर भक्तिसागर परिसरातील स्वच्छतेसह भाविकांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन प्रशासनाने करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

Pandharpur News: पंढरपूरच्या सफाई कामगारांना दिवाळी गिफ्ट! प्रत्येकी ६०० चौरस फुटांचे घर, ५६ कोटींचा निधी मंजूर

पंढरपुरात एका कार्यक्रमानिमित्त आले असता पालकमंत्री गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, तहसीलदार सचिन लंगुटे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आषाढी यात्रेच्या काळात शहरात स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्याच धर्तीवर कार्तिकी यात्रेतही सर्व व्यवस्था करण्यात येणार आहेत. यासंदर्भात प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या जातील. कार्तिकी यात्रेच्या नियोजनासाठी लवकरच स्वतंत्र बैठक घेऊन सर्व विभागांचा आढावा घेतला जाईल. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे गोरे यांनी स्पष्ट केले.

‘मला तोंड उघडायला लावू नका’; रोहित पवारांना सूचक इशारा

दरम्यान, आ. रोहित पवार यांच्याकडून होत असलेल्या टीकेबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, ‘मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. सोन्याचा चमचा घेऊन किंवा कुणाच्या आजोबांच्या नावावर राजकारणात आलेलो नाही. कष्टाच्या जोरावर आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे चार वेळा आमदार झालो आहे. मलाही सर्वांची सर्व माहिती आहे. मात्र, मला तोंड उघडायला लावू नका. आज दिवाळीचा सण असल्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही.’

गोरे यांच्या या वक्तव्यामुळे रोहित पवार यांच्या टीकेला त्यांनी सूचक प्रत्युत्तर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कार्तिकी यात्रेच्या नियोजनासाठी पंढरपुरात आलेल्या पालकमंत्र्यांच्या विकासकामांसोबतच या राजकीय विधानाचीही चर्चा रंगली आहे.

मी कडुलिंबासारखे गुणकारी औषध

‘मी कडुलिंबासारखे गुणकारी औषध आहे. माझ्या सानिध्यात जे येतील, ते चांगलेच वागतील. कडुलिंब कडू असला तरी सर्व रोग बरे करतो. आमदार समाधानदादा, तुम्ही पण माझ्यासाठी या कडुलिंबाचा काढा प्या, म्हणजे पोट कमी होईल,’ असा मिश्किल टोला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार समाधान आवताडे यांना लगावला. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.

Nagpur News : शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले मुख्यमंत्री; कापूस आणि तुरीच्या नुकसानीची पाहणी; मदतीपासून शेतकरी वंचित राहणार नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कार्तिकी यात्रेचे नियोजन कोणत्या धर्तीवर करण्यात येणार?

    Ans: आषाढी यात्रेच्या धर्तीवर कार्तिकी यात्रेचे नियोजन करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

  • Que: कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोणत्या सुविधांना प्राधान्य दिले जाणार?

    Ans: शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, प्रदक्षिणा मार्गाची दुरुस्ती, चंद्रभागा नदी परिसराची स्वच्छता आणि ६५ एकर भक्तिसागर परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य दिले जाणार आहे.

  • Que: कार्तिकी यात्रेदरम्यान चंद्रभागा नदी परिसरात कोणती कामे केली जाणार?

    Ans: चंद्रभागा नदी परिसराची स्वच्छता करून भाविकांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

Web Title: Pandharpur kartiki yatra 2026 jaykumar gore on planning pilgrims facilities pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 08:24 PM

Topics:  

  • Jaykumar Gore
  • Kartiki Yatra
  • pandharpur
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Rohit Pawar : ‘तटकरेंना अजितदादांची जागा घ्यायची होती’; रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप
1

Rohit Pawar : ‘तटकरेंना अजितदादांची जागा घ्यायची होती’; रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Jaykumar Gore Diwali Celebration : ऊसतोड कामगारांच्या झोपडीत फुलवला दिवाळीचा आनंद; जयकुमार गोरेंनी जपली माणुसकी
2

Jaykumar Gore Diwali Celebration : ऊसतोड कामगारांच्या झोपडीत फुलवला दिवाळीचा आनंद; जयकुमार गोरेंनी जपली माणुसकी

Rohit Pawar vs Jaykumar Gore : ‘माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहिती आहे’, रोहित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने जयकुमार गोरे संतापले
3

Rohit Pawar vs Jaykumar Gore : ‘माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहिती आहे’, रोहित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने जयकुमार गोरे संतापले

Rohit Pawar : ‘सरकारचं डोकं सटकलंय, भाजपसोबत जास्त काळ राहू नका!’ एकनाथ शिंदेंना रोहित पवारांचा अप्रत्यक्ष सल्ला
4

Rohit Pawar : ‘सरकारचं डोकं सटकलंय, भाजपसोबत जास्त काळ राहू नका!’ एकनाथ शिंदेंना रोहित पवारांचा अप्रत्यक्ष सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.