महायुतीतल्याच मित्र पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आजतरी स्वतंत्र राजकीय चूल मांडली आहे. यामुळे पंढरपूर नगरपालिकेची आगामी निवडणूक अधिक चुरशीची होईल असे दिसत आहे.
पंढरपूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शहरात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. अनेक इच्छुक उमेदवार तन, मन आणि धनाने प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत.
कार्तिकी यात्रा ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या यात्रेसाठी लाखो भाविक ठिकठिकाणाहून या यात्रेमध्ये सहभागी होतात. या यात्रेमध्ये यंदा उत्पन्नामध्ये मागील वर्षीपेक्षा दीड कोटींची वाढ झालेली आहे.
नगरपरिषद निवडणुकीचा माहोल आता पंढरपूरातही जोरदार तापला आहे. २ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्याचबरोबर १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत अर्जही भरणे सुरू होणार आहेत.
vineyard harvesting: सोलापूर तालुक्यातील सर्वच भागातील गावांत द्राक्ष बागांच्या शेवटच्या किंवा मागास छाटण्या सर्वत्र सुरू आहेत. तसेच द्राक्ष बागेत काव पेस्ट लावण्याचे काम सुरू आहे.
मंदिरातील श्री विठ्ठल चौखांबी, सोळ खांबी परिसर, रुक्मिणी मातेचे मंदिर, तसेच प्रवेशद्वार, या सर्व भागात कलात्मक डेकोरेशन करण्यात आले आहे. पारंपारिक आणि आधुनिक फुलांच्या रचना यांचा सुंदर संगम भाविकांना एक अद्भुत दृश्यानुभ
दिवाळीच्या सणात कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि भेटवस्तू देऊन खूश करतात हे सामान्य आहे. मात्र पंढपुरच्या मंदिरात कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या दिवाळी भेटवस्तूमुळे आता चर्चेचा विषय बनला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यात येणार असून, महापूजेचे निमंत्रण शिंदे यांना दिले आहे.
वारकरी संप्रदायासाठी विठोबाइतकाच चंद्रभागा नदीचा महिमा मानला जातो. "जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा" अशी ख्याती असलेल्या या नदीचे महत्त्व दुर्लक्षित होत असल्याचा आरोप अंकुशराव यांनी केला आहे.
ओढ्यावरून पलीकडे जाण्यासाठी पूल नसल्यामुळे अक्षरशा ओढ्याच्या भिंतीवरील पाच ते सहा फूट पाण्यातून उपरी येथील शेतकरी, शालेय विद्यार्थी व महिलांना दररोज जीव घेणाप्रवास करावा लागत आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आपल्या कारकिर्दीत मिळाला याचे समाधान आहे, आता हे संत साहित्य भारतातील १४ भाषांमध्ये पोहोचण्यासाठी आवश्यक आहे ते ते करु, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.
Pandharpur Revised Development Plan : पंढरपूर तीर्थक्षेत्र सुधारित विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये राज्य सरकारकडून सफाई कर्मचाऱ्यांना ६०० चौरस फुटांची घरे देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
एका विवाहित महिलेनं लवअफेअरसाठी प्रियकराच्या मदतीने तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचला. ही हत्या एक्दम फिल्मी स्टाईल ने करण्यात आल्याचे समोर आले आहे. या सस्पेन्स हत्याचा नेमकं प्रकरण…