rain
गोंदिया : गेल्या २-३ दिवसापासून राज्यात पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर गोंदियात पावसाने (Gondiya Rain) कहर केला असून जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. पावसाची स्थिती बघता शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
कोकण मध्य महाराष्ट्रासह विदर्भात चांगलाच पाऊस पडत आहे. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. आज सकाळपासूनच पावसाने जिल्ह्यामध्ये हजेरी लावली. धरणे, जलाशय आणि नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अलर्टनुसार गोंदिया जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
[read_also content=”केदार दिघेंना अटकपूर्व जामीन मंजूर, वाच काय आहे नेमकं प्रकरण https://www.navarashtra.com/maharashtra/pre-arrest-bail-granted-to-kedar-dighe-read-what-is-the-actual-case-nrps-314366.html”]
जिल्ह्यात कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने अनेकांच्या घरी पाणी शिरले. यामुळे रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. तर अनेक घरी पाणी शिरल्याने कुलरच्या मोटारने घरातील पाणी काढत आहेत. असलेल्या मुसळधार पावसाने नदी नाले ओसंडून वाहत आहे. तळेसुद्धा ओव्हर फ्लो झाले आहेत. अतिवृष्टी होण्याची शक्यता लक्षात घेता संभाव्य अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा, अंगणवाडी, शिकवणी वर्ग यांना जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी 10 ऑगस्टला सुट्टी जाहीर केली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
[read_also content=”नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांना बंदी; बैताडी जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला https://www.navarashtra.com/latest-news/indian-tourists-banned-in-nepal-cause-the-threat-of-corona-has-increased-in-baitadi-district-nrgm-314219.html”]