Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांच्यावर राष्ट्रवादीकडून मोठी कारवाई; उपमुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश

राजकीय वरदहस्तातून हगवणे यांच्यावर कडक कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला जात होता. याच आरोपांची गंभीर दखल घेत वैष्णवीचे सासरे आणि राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 22, 2025 | 12:08 PM
वैष्णवीच्या अंगावर तब्बल 29 मारहाणीचे व्रण

वैष्णवीच्या अंगावर तब्बल 29 मारहाणीचे व्रण

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सूनेने टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन राजकीय वर्तुळातही एकच चर्चा सुरु आहे. वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या नसून, हत्या असल्याचा आरोपी तिच्या पालकांनी केला होता. याप्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी कारवाई करण्यात आली असून, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले.

वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर हगवणे कुटुंबावर कारवाईचा फार्स आवळला जात असून, पोलिसांनी बुधवारी हुंड्यात दिलेली फॉर्च्यूनर कार आणि अॅक्टिव्हा गाडी जप्त केली आहे. पोलिसांनी मुळशीतील घरी जाऊन कारवाई केली. वैष्णवीला नेमका काय जाच झाला हे तिने एका मैत्रिणीकडे सांगितले होते, त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये, तिने सासरच्यांनी जाच केल्याचे म्हटले आहे. वैष्णवी यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन झाले. या अहवालानुसार, तिच्या शरीरावर हात, पाय, मांडी आणि हनुवटीसह अनेक ठिकाणी मारहाणीच्या जखमा आणि रक्त साकळलेले डाग आढळले आहेत. या जखमांमुळे तिचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राजकीय वरदहस्तातून हगवणे यांच्यावर कडक कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला जात होता. याच आरोपांची गंभीर दखल घेत वैष्णवीचे सासरे आणि पुणे जिल्ह्यातील मुळशीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री पवारांकडून कारवाईच्या सूचना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुणे पोलिस आयुक्तांशी बोलणे झाले आहे. त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अजित पवार नेहमी दोषींवर कारवाई करा, असं म्हणतात, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. याही प्रकरणात दोषींवर कारवाई होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी म्हटले आहे.

Web Title: Rajendra hagawane dismiss from ncp party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 11:29 AM

Topics:  

  • Mahaharashtra Politics
  • Rajendra Hagawane
  • Vaishnavi hagawane

संबंधित बातम्या

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट! सासू, नणंदेसह तिघांना न्यायालयाचा दणका
1

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट! सासू, नणंदेसह तिघांना न्यायालयाचा दणका

वैष्णवी हगवणे आत्महत्त्याप्रकरणी मोठी अपडेट; नीलम गोऱ्हे यांनी दिली ‘ही’ माहिती
2

वैष्णवी हगवणे आत्महत्त्याप्रकरणी मोठी अपडेट; नीलम गोऱ्हे यांनी दिली ‘ही’ माहिती

Vaishnavi Hagawane Death Case: ‘कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठीचा अत्याचार…’, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा
3

Vaishnavi Hagawane Death Case: ‘कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठीचा अत्याचार…’, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा

हिंदी सक्ती, जनसुरक्षा विधेयक आणि शक्तिपीठ महामार्गावर शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्याकडून भाष्य
4

हिंदी सक्ती, जनसुरक्षा विधेयक आणि शक्तिपीठ महामार्गावर शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्याकडून भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.