Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“राखी सावंत आणि अमृता फडणवीस एकाच नाण्याच्या दोन बाजू?”, दोघीही सारख्याच…काय म्हणाल्या सुषमा अंधारे? वाचा…

राखी सावंत गायिका आहेत, अमृता फडणवीसही गायिका आहेत. तसेच राखी सावंत मॉडेल आहेत, तसं अमृता फडणवीसही मॉडेल आहेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे यांनी राखी सावंत आणि अमृता फडणवीस यांची तुलना केली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Apr 08, 2023 | 12:52 PM
“राखी सावंत आणि अमृता फडणवीस एकाच नाण्याच्या दोन बाजू?”, दोघीही सारख्याच…काय म्हणाल्या सुषमा अंधारे? वाचा…
Follow Us
Close
Follow Us:

परभणी : सत्तांतर झाल्यापासून भाजप-शिंदे गट व मविआ नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरु आहे. दरम्यान, आता शिवसेना उपनेता तसेच ठाकरे गटाच्या फायरब्रँड उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अभिनेत्री, मॉडेल व आयटम गर्ल राखी सावंत (Rakhi Sawant) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यात तुलना केली आली आहे. त्यामुळं कालपासून चर्चंना उधाण आलं असून, राखी सावंत व अमृता फडणवीस यांच्यात साम्य काय आहे, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा आज परभणीत पोहोचली. यावेळी सुषमा अंधारे बोलत होत्या. त्यांच्या या तुलनेवरुन आका भाजपकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राखी सावंतची तुलना अमृताशी माझ्याशी नाही…

दरम्यान, राखी सावंत गायिका आहेत, अमृता फडणवीसही गायिका आहेत. तसेच राखी सावंत मॉडेल आहेत, तसं अमृता फडणवीसही मॉडेल आहेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे यांनी राखी सावंत आणि अमृता फडणवीस यांची तुलना केली आहे. राखी सावंत यांची तुलना अमृता फडणवीस यांच्याशी होऊ शकते माझ्याशी नाही, असं म्हणत मोहित कंबोज यांनी केलेल्या तुलनेचा अंधारेंनी समाचार घेतला आहे. “सुषमा अंधारे आणि राखी सावंत दोघी बहिणी आहेत,” असं वक्तव्य कंबोज यांनी केलं होतं. याला जोरदार प्रतिउत्तर अंधारेंनी दिलं आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

परभणीत बोलताना अंधारे म्हणाल्या की, “आमची राखी ताई सिंगर आहे. आमच्या अमृता वैनी सिंगर आहेत. आमची राखी ताई मॉडेल आहे. आमच्या अमृता वैनींपण मॉडेल आहेत. राखी सावंत या बिचारी माऊलीची तिच्या क्षेत्रानुसार तुलनाच होऊ शकेल तर ती फार फार तर आमच्या अमृता वैनींसोबत होईल. असं काय करता दादा? बघा, आमच्या राखी ताईंच्या चेहऱ्याची सर्जरी झालीय, आमच्या अमृता वैनींचीसुद्धा चेहऱ्याची सर्जरी झालीय. जर तुमचा उद्देश चांगला असेल तर तुम्हाला हे सत्य मान्य करावं लागेल”, असं सुषमा अंधारे आपल्या भाषणात म्हणाल्या. अंधारे यांच्या या तुलनेवरुन आका भाजपकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Rakhi sawant and amruta fadnavis are two sides of the same coin both are the same what did sushma andhare say read

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2023 | 12:52 PM

Topics:  

  • Mohit Kamboj
  • Thackeray Group

संबंधित बातम्या

BJP-Shivsena Alliance : “…तर मुंबईत उद्धव ठाकरेंना उमेदवार मिळणार नाहीत; चंद्रकांत पाटलांनी दिले युतीचे संकेत?
1

BJP-Shivsena Alliance : “…तर मुंबईत उद्धव ठाकरेंना उमेदवार मिळणार नाहीत; चंद्रकांत पाटलांनी दिले युतीचे संकेत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.