Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या राजकारणात ‘सीमोल्लंघन’ ! राम शिंदेंची यशवंतराव गडाखांशी भेट

पालकमंत्र्यांच्या बैठकीपूर्वीच शिंदेंची 'फिल्डिंग'! आजच होणार खरा फैसला!' विशेष म्हणजे, या राजकीय समीकरणांना वेग आला असतानाच, पालकमंत्री महोदयांनी आज दुपारी ३ वाजता तातडीची बैठक बोलावली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 20, 2026 | 02:21 PM
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या राजकारणात ‘सीमोल्लंघन’ ! राम शिंदेंची यशवंतराव गडाखांशी भेट

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या राजकारणात ‘सीमोल्लंघन’ ! राम शिंदेंची यशवंतराव गडाखांशी भेट

Follow Us
Follow Us:
  • राम शिंदे यांनी थेट सोनई गाठले
  • यशवंतराव गडाख यांची घेतली भेट
  • जिल्ह्याच्या राजकीय पटलावर एकच खळबळ
अहिल्यानगर / पोपट पिटेकर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस उरलेला असतानाच, राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून देणारी घडामोड समोर आली आहे! भाजपचे ज्येष्ठ नेते व सभापती राम शिंदे यांनी थेट सोनई गाठत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या अचानक झालेल्या भेटीमुळे जिल्ह्याच्या राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. बँक बिनविरोध होण्याच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी राम शिंदे यांनी थेट गडाखांकडेच साकडं घातलं असून, “ज्येष्ठांनी आता हस्तक्षेप करावाच लागेल!”असा थेट आणि आक्रमक पवित्रा राम शिंदेंनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना घेतला.

“ज्याची चूक आहे त्याला चूक म्हणा!” – राम शिंदेंचा थेट इशारा- भेटीनंतर राम शिंदेंनी पत्रकारांशी बोलताना आरपारची भाषा वापरली. विजयादशमीच्या शुभेच्छा देत ते म्हणाले, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँक ही केवळ राजकारणाचा आखाडा नाही; ती शेतकरी, कारखानदार आणि लाखो सभासदांची बँक आहे! ही बँक बिनविरोध काढायची असेल तर यशवंतराव गडाखांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केलीच पाहिजे. ज्यांची चूक आहे त्यांना ‘चूक’ आणि ज्यांचं बरोबर आहे त्यांना ‘बरोबर’ म्हणण्याची धमक दाखवून वडीलकीच्या नात्याने सगळ्यांना सामोपचाराचा संदेश दिला पाहिजे!

टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबारासाठी वापरलेली बाईक २५ हजारांना खरेदी; नवरात्रीमुळे कागदपत्रं रखडली, तपासात मोठा खुलासा

पालकमंत्र्यांच्या बैठकीपूर्वीच शिंदेंची ‘फिल्डिंग’! आजच होणार खरा फैसला!’ विशेष म्हणजे, या राजकीय समीकरणांना वेग आला असतानाच, पालकमंत्री महोदयांनी आज दुपारी ३ वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. मात्र, पालकमंत्र्यांच्या या बैठकीआधीच राम शिंदे यांनी सोनईत जाऊन गडाखांची भेट घेतल्याने राजकीय गोटात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यावर स्पष्टीकरण देताना राम शिंदे म्हणाले, “पालकमंत्र्यांशी बोलून मी इथे आलेलो नाही. पण दुपारी ३ वाजता बिनविरोधच्या संदर्भात बैठक बोलावल्याचं मला समजलं. पालकमंत्र्यांचा मलाही फोन आला असून मी त्या बैठकीला नक्की जाणार आहे. पण त्याआधीच बिनविरोधचा मार्ग सुकर व्हावा म्हणून मी गडाख साहेबांची भेट घेतली.”

“उद्या ३ वाजेपर्यंत ‘सीमाउल्लंघन’ स्पष्ट होईल!”

दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने राम शिंदे यांनी अत्यंत सूचक आणि आक्रमक विधान केले. “आज विजयादशमीचं सीमाउल्लंघन ठरवलं जाईल आणि उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्हा बँकेवर कोणाचे वर्चस्व राहते आणि बँक खरोखर बिनविरोध होते की रणसंग्राम पेटतो, हे स्पष्ट होईल!” असा थेट इशाराच शिंदेंनी दिला आहे.

आता पालकमंत्र्यांच्या दुपारी ३ वाजता होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो आणि उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत कोणकोणते अर्ज मागे घेतले जातात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे!

FAQ

नक्की काय घडले? राम शिंदे-गडाख भेट का चर्चेत?

– अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (ADCC) निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद सभापती राम शिंदे (भाजप) यांनी ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख (नेवासा गड) यांची भेट घेतली.

जिल्हा बँक निवडणूक काय आहे?

– अहिल्यानगर (अहमदनगर) DCC – शेतकऱ्यांची सर्वात मोठी बँक. यामध्ये अनेक शेतकरी सभासद आहेत.

राम शिंदे यांची भूमिका काय?

– राम शिंदे हे सध्या महाराष्ट्र विधानपरिषद सभापती आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघ – रोहित पवार विरुद्ध पारंपारिक लढाई असल्याचे पाहिला मिळत आहे.

Web Title: Ram shinde meeting with yashwantrao gadakh for ahilyanagar district bank nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 02:21 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.