Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आधीच्या मंत्रि‍पदाच्या काळात केलेल्या भानगडीमुळे…”; शिंदे गटातील नेत्यावर रावसाहेब दानवेंचे टिकास्त्र

महायुतीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. महायुतीमध्ये अनेक नेत्यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आलेली नाही. याबाबत आता रावसाहेब दानवे यांनी विधान केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 15, 2025 | 05:26 PM
Raosaheb-Danve gives reason why Why Abdul Sattar doesn't have a second chance

Raosaheb-Danve gives reason why Why Abdul Sattar doesn't have a second chance

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी झाल्यानंतर जोरदार राजकारण तापले आहे. महायुतीमधील अनेक नेते हे नाराज असल्याची चर्चा आहे. महायुतीमध्ये जागावाटप, मुख्यमंत्रिपद, पालकमंत्री, खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार अशाच सर्वच बाबींवरुन नाराजीनाट्य रंगले. छगन भुजबश, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार अशा अनेक नेत्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी न दिल्यामुळे नाराजीचा पूर आला. यामध्ये आता अब्दुल सत्तार यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी का देण्यात आली नाही याबाबत रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. याची सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महायुतीसह महाविकास आघाडीने स्वबळाचा नारा दिला आहे. महायुती व महाविकास आघाडीचे मित्रपक्ष स्वबळावर लढणार का याबाबत निर्णय झालेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबत निर्णय सुप्रीम कोर्ट घेणार आहे.  मात्र त्याआधीच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे) पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. आता भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्याबाबत एक मोठं विधान केलं आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांना महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली नाही. सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे अब्दुल सत्तार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांनी पुन्हा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद का मिळालं नाही? याचं कारण सांगताना रावसाहेब दानवे यांनी मोठं भाष्य केलं आहे. ‘अब्दुल सत्तारांनी आधीच्या मंत्रिपदाच्या काळात केलेल्या भानगडीमुळे मंत्रिपद गेलं’, असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

माध्यमांशी संवाद साधताना भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले की, “सिल्लोडमधील प्रत्येक चौकाचं नाव काय आहे हे पाहा. सिल्लोडमधील एकाही चौकात महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, श्यामाप्रसाद मुखर्जी किंवा जवाहरलाल नेहरु यांचे नाव नाही. नावावरून तर त्या गावची रचना कळती ना? मग त्यांची विचारधारा कोणती? म्हणजे खायचं येथील आणि गायचं कुठलं? मी आजही म्हणतो की पाकिस्तानसारखी परिस्थिती सिल्लोडमध्ये आहे”, असा हल्लाबोल रावसाहेब दानवे यांनी केला.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “महापुरुषांच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणची जागा बळकावण्याचे काम सिल्लोडमध्ये सुरु आहे. सिल्लोडच्या जिल्हा परिषदेची चार एकरची जागा महापालिकेत घेतली, आता त्या ठिकाणी शॉपिंग सेंटर बांधतील, त्यानंतर ते विकून टाकतेन आणि पैसे घेतील. मात्र, तरीही सिल्लोडची जनता गप्प आहे. तसेच अब्दुल सत्तारांचं मंत्रिपद हे त्यांच्या मंत्रि‍पदाच्या काळात केलेल्या भानगडीमुळे गेलं”, असा हल्लाबोल रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

Web Title: Raosaheb danve gives reason why why abdul sattar doesnt have a second chance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 05:25 PM

Topics:  

  • Abdul Sattar
  • Mahayuti Government
  • Raosaheb Danve

संबंधित बातम्या

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु
1

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु

महाराष्ट्रातील कृषीमंत्रिपद ठरतंय काटेरी मुकुट; ‘या’ पाच बड्या नेत्यांना सोडावं लागलं मंत्रिपद
2

महाराष्ट्रातील कृषीमंत्रिपद ठरतंय काटेरी मुकुट; ‘या’ पाच बड्या नेत्यांना सोडावं लागलं मंत्रिपद

Ladki Bahin Yojana july installment : लाडक्या बहिणींना कधी मिळणार जुलैचा हप्ता; रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर तरी होणार का धनलाभ?
3

Ladki Bahin Yojana july installment : लाडक्या बहिणींना कधी मिळणार जुलैचा हप्ता; रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर तरी होणार का धनलाभ?

महिला बचत गटांसाठी उमेद मॉल, विशेष न्यायालये अन्…; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय
4

महिला बचत गटांसाठी उमेद मॉल, विशेष न्यायालये अन्…; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.