
फिशरीज वेल्फेअर फाऊंडेशनतर्फे मंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी
पायाभूत सुविधा नसल्याने वेळ व पैशांचा अपव्यय
मच्छीमार व्यवसायाकरिता अद्ययावत, प्रशस्त जेट्टीची मागणी
मंडणगड: तालुक्यातील किनारी भागात असलेल्या वाल्मिकीनगर येथे मच्छिमार व्यवसायाकरिता अद्यावत व प्रशस्त जेट्टीची निर्मिती करण्याची मागणी फिशरीज वेलफेअर फौंडेशनचे अध्यक्ष सुनील खाडे, उपाध्यक्ष हेमंत सालदुरकर यांनी बंदरविकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली असून त्या मागणीच्या अनुषंगाने संबंधित महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने कार्यवाही सुरु असल्याची माहिती फिशरीज वेलफेअर फौंडेशनचे अध्यक्ष सुनील खाडे यांनी दिली, फिशरीज वेलफेअर फौंडेशनचे अध्यक्ष सुनील खाडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, अरबी समुद्र आणि सावित्री नदीच्या संगमानजिक असलेले वाल्मिकीनगर या गावातील मत्स्यव्यवसाय हा पारंपारिक व्यवसाय असून येथील जवळपास सर्वच कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन मत्स्यव्यवसाय हा आहे.
पायाभूत सुविधा नसल्याने वेळ व पैशांचा अपव्यय
सध्या या परिसरातून सुमारे ८० हून अधिक यांत्रिकी नौकांद्वारे मासेमारी केली जाते, याचबरोबर या बंदर परिसरातील अपसापास गावांचा माछडीमार व्यासायिक या बदराचा वापर करतात, मात्र, आजतागायत या ठिकाणी स्वतंत्र व सुसज्ज मत्स्यव्यवसाय जेटी उपलब्ध नसल्याने मच्छीमारांना मोठा अडचणींना सामोरे जागे लागत आहे. आवश्यक पायाभूत सुविधा नसल्याने वेळ व पैशांचा अपव्यय होतो. वाल्मिकीनगर परिसरात लिलावगृह, मासे उतरवण्याचे केंद्र, जाळे दुरुस्ती केंद्र, शीतगृह व प्रशासकीय इमारत अशा सर्व सोधीनी युक्त अत्याधुनिक जेटी उभारण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
माल्मिकीनगर येथे सई सोयीयुक्त अत्याधुनिक जेटीची निर्मिती केल्यास देशोल हजारी माझीमारांना मोठा दिलासा मिळणार असून मास्यव्यवसाय अधिक सक्षम व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल, यासंदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड च मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या वतीने तत्काळ कार्यवाही करून जेड्डी मंजूर करावी.
– सुनील खाडे, अध्यक्ष, फिशरीज वेलफेअर फीडेशन
वाल्मीकिनगर येथे मगणी करण्यात आलेल्या व त्यासंदर्भात सबंधित विभागाच्या वतीने कार्यवाही सुरु असलेल्या सोयी-सुविधांयुक्त जेटीसंदर्भात लवकरच कार्यवाही पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे. येथील मच्छिमार बांधवांच्या समस्या लक्षात घेता व मासेमारी व्यवसायाला प्राधान्य देण्याकरिता शासनाने जेट्टीची मागणी पूर्ण करावी.
हेमंत सालदूरकर,
उपाध्यक्ष फिशरीज वेलफेअर फौंडेशन