Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना…”; अनुयायींकडून महामानवाला अभिवादन!

]डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने रत्नागिरीत अनुयायांनी महामानवाला अभिवादन केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 06, 2024 | 11:59 AM
"भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना..."; अनुयायींकडून महामानवाला अभिवादन!

"भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना..."; अनुयायींकडून महामानवाला अभिवादन!

Follow Us
Close
Follow Us:

रत्नागिरी/ प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशात अनेक मोठ्या मान्यवरांकडून महामानवाला अभिनवादन केलं जात आहे. दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय मुंबईत येत असतो. मात्र याचपार्श्वभूमीवर रत्नागिरी आणि तालुक्यातील गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाअभिवादन करण्यासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने जनसमुदाय लोटला होता. अनुयायी रत्नागिरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ दाखल झाले होते. मध्यरात्री १२ वाजताच रत्नागिरी तालुक्यातील दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अनंत सावंत, जिल्हा पदाधिकारी विजय जाधव आणि सहकारी प्रदीप जाधव यांच्या हस्ते आधुनिक भारताचे निर्माते, विश्वरत्न, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विशेष म्हणजे यंदा नागरिकांनी “वही-पेन आणि शैक्षणिक साहित्य” देऊन बाबासाहेबांना वैचारिक अभिवादन केले.

आजही लाखो तरुणांचे आयुष्य बदलतात बाबासाहेबांचे ‘हे’ विचार; महामानवाची विचारसरणी

गुरुवारी ५ डिसेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासूनच गाव-वाड्यामधून अनुयायी रत्नागिरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दाखल होण्यास सुरुवात झाली होती. तान्हुल्यापासून वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील अनुयायांच्या पुतळ्याजवळ लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्री ठीक १२ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच संयुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुतळ्यास पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर पंचशील ग्रहण करून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. रत्नागिरीच्या दिशेने येणारे अनुयायांचे जथ्थेच्या जथ्थे व त्यांना शिस्तीने सोडणारे समता सैनिक दलाचे सैनिक, चळवळीतील कार्यकर्ते, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग ते पुतळा परिसराच्या दिशेने अत्यंत शिस्तीने चालणारे हजारो अनुयायी पोलिसांना सहकार्य करताना पाहायला मिळाले.

महापरिनिर्वाण दिन: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची अनोखी मानवंदना !

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास नियोजनानुसार विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, धम्म बांधव अभिवादन करण्यासाठी दाखल होतात. जवळपास एक ते दोन तास शिस्तबध्द पध्दतीने डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगा लागली होती. वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. रत्नागिरी येथे दाखल होणाऱ्या अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता धम्म बांधवांना दर्शन घेणे सुकर होण्यासाठी समता सैनिक दलाच्या सैनिकांनी पोलिसांना उत्तम सहकार्य केले.

Web Title: In ratnagiri samata sainik dal and local dr babasaheb ambedkar has been saluted on the occasion of mahaparinirvana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 11:59 AM

Topics:  

  • babasaheb ambedkar
  • Dr. Babasaheb Ambedkar

संबंधित बातम्या

Ambedkar National Memorial : पुण्यात भीमसैनिकांचे ठिय्या आंदोलन; आंबेडकर राष्ट्रीय स्मारकांच्या मागणीसाठी आक्रमक
1

Ambedkar National Memorial : पुण्यात भीमसैनिकांचे ठिय्या आंदोलन; आंबेडकर राष्ट्रीय स्मारकांच्या मागणीसाठी आक्रमक

Jitendra Awhad News: शिरसाट, कोकाटेंनंतर आता जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान; सनातन धर्म नावाचा कोणताही धर्म नव्हता….’
2

Jitendra Awhad News: शिरसाट, कोकाटेंनंतर आता जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान; सनातन धर्म नावाचा कोणताही धर्म नव्हता….’

Mumbai News: “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व व्यासंगी व बहुआयामी होते”; CJI भूषण गवई
3

Mumbai News: “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व व्यासंगी व बहुआयामी होते”; CJI भूषण गवई

Ahilyanagar : डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, सामाजिक उपक्रमाचे कौतुक
4

Ahilyanagar : डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, सामाजिक उपक्रमाचे कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.