फोटो सौजन्य - Social Media
भारताचे घटनाकार म्हणून सर्वत्र जगभरात ख्याती असणारे बाबासाहेब आंबेडकर जगातील प्रत्येकासाठी प्रेरणेचा एक स्रोत आहे. अशा व्यक्ती पुन्हा होणे नाही. भारताला योग्य दिशा दावणाऱ्या या महामानवाची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या विचारांनी अनेक तरुण तरुणी आपल्या जीवनाचे मार्ग शोधत आहेत. यश कसे मिळवले जाते? याचे उत्तम उदाहरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचो संघर्षगाथा आहे. आयुष्याचा अर्थ काय असतो आणि त्याचे उद्दिष्टे कसे ठरवावेत? या गोष्टी समजून घेण्यासाठी आधी बाबासाहेबांचे विचार समजावे लागतील.
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा
बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात शिक्षणाला फार महत्व दिले. सुबल असो वा दुर्बल, समाजाच्या प्रत्येक घटकाला शिकण्यासाठी प्रेरित केले. समाजात समानता आणण्यासाठी शिक्षण फार महत्वाचे असून प्रत्येकाच्या प्रगतीसाठी शिक्षण हे अपरिहार्य आहे. त्यांच्या विचारसरणीत शिक्षणाला एक विशेष महत्व होते.
स्वाभिमानाशिवाय स्वातंत्र्य मिळवता येत नाही
जर समाजात आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल. समाजात मान मिळवायचा असेल. तर पहिले स्वतःचा सन्मान करण्यास शिका. सन्मानासाठी लढा द्या. बाबासाहेब नेहमी म्हणत असत कि,”स्वाभिमानाशिवाय स्वातंत्र्य मिळवता येत नाही.” त्यांच्या विचारांवर आधारित संघर्षाची मानसिकता तरुणांना स्वतःच्या हक्कांसाठी उभे राहण्यास शिकवते.
सर्व माणसांना समानतेचा अधिकार असावा.
समाजात समानता असणे आवश्यक आहे. आजच्या तरुणांमध्ये जात, धर्म तसेच लिंग यावरून भेद कमी असणे ही गोष्ट बाबासाहेबांच्या विचारांची देन आहे. बाबासाहेब नेहमी म्हणायचे कि ‘सर्व माणसांना समानतेचा अधिकार असावा.’ या पृथ्वीवर जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती समान आहे.
महिला सक्षम झाल्याशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही.
बाबासाहेबांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूप प्रयत्न केले. ते म्हणाले, “महिला सक्षम झाल्याशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही.” आज अनेक महिला त्यांच्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणावर योगदान देत आहेत.
आजच्या तरुणांसाठी प्रेरणा:
तरुणांनी संघर्ष, चिकाटी तसेच सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा, याबद्दल बाबासाहेबांचे काही विचार आहेत. बाबासाहेबांच्या विचारांमुळे तरुणांना संघर्ष, चिकाटी, आणि सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायचा हे शिकता येते. त्यांचे सुविचार –
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी आजही तरुण पिढीला प्रेरित करते. त्यांचे विचार केवळ आयुष्याला दिशा देत नाहीत, तर एक उत्तम समाज घडवण्याचे स्वप्न दाखवतात.