Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप

Konkan Ganpati Visarjan: अनंत चतुर्दशीनिमित्त कोकणात घरगुती आणि सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांना पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली आहे. ढोल-ताशे, झांज, लेझीम, टाळ-मृदंग आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात भाविक आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 25, 2026 | 05:51 PM
‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप

‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप

Follow Us
Follow Us:
  • ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’
  • ढोल-ताशांचा गजर, फुगड्यांचा फेर अन् मोरयाचा जयघोष
  • कोकणात गणरायाच्या विसर्जनाचा जल्लोष
 

शिरगाव : बारा दिवसांच्या भक्ती, उत्साह आणि आनंदानंतर कोकणातील गणेशोत्सवाची अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तिमय सांगता होत आहे. गावागावांत घरगुती आणि सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली असून, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत भाविकांनी गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा केली. आता बाप्पाला निरोप देताना भाविकांमध्ये उत्साहासोबतच भावूक वातावरणही पाहायला मिळत आहे. महिला, पुरुष, युवक आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभाग घेतला आहे.

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

कोकणातील गणेश विसर्जनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे आजही पारंपरिक संस्कृती आणि लोककलांची परंपरा जपली जाते. ढोल-ताशे, झांज, लेझीम, टाळ-मृदंग आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात गणरायाच्या मिरवणुका निघत आहेत. काही ठिकाणी महिला फुगड्या खेळत आहेत, तर युवक ढोल-ताशांच्या तालावर नृत्य करत बाप्पाला निरोप देत आहेत.

गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नदी, तलाव तसेच प्रशासनाने निश्चित केलेल्या विसर्जनस्थळांवर भाविकांची गर्दी होत आहे. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि स्वयंसेवकांकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.

यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर दिला जात आहे. नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम विसर्जन कुंडांचा वापर करण्याचे आवाहन अनेक मंडळे आणि स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विसर्जनस्थळी गर्दी करताना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे आणि शांततेत विसर्जन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने कोकणातील गावागावांत भक्ती, परंपरा, संस्कृती आणि आपुलकीचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. दहा दिवस घराघरांत विराजमान झालेल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावत असले, तरी पुढच्या वर्षी बाप्पा पुन्हा लवकर यावा, अशी प्रार्थना प्रत्येकाच्या ओठांवर आहे.

लालबागचा राजा यांच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सकाळपासूनच लालबाग परिसरात मोठी गर्दी झाली आहे. बाप्पाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक रस्त्याच्या दुतर्फा जमा झाले आहेत. ढोल-ताशांचा गजर, गुलाल आणि फुलांच्या उधळणीत मुंबईतील मानाच्या गणपतींच्या मिरवणुका विसर्जनस्थळांच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. मुंबईतील गिरगाव चौपाटी हे प्रमुख विसर्जनस्थळ असून येथे मोठ्या सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. याशिवाय जुहू चौपाटी आणि शहरातील विविध नैसर्गिक व कृत्रिम विसर्जनस्थळांवरही व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा महापालिकेने मुंबईत 383 हून अधिक कृत्रिम तलाव आणि 67 नैसर्गिक विसर्जनस्थळे तयार केली आहेत. विसर्जनासाठी 25 हजारांहून अधिक महापालिका कर्मचारी तसेच जीवरक्षक, रुग्णवाहिका आणि मोटरबोटींची व्यवस्था करण्यात आले आहेत.

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन

Web Title: Konkan anant chaturdashi ganpati visarjan processions traditional celebrations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • Ganpati Visarjan
  • Konkan

संबंधित बातम्या

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
1

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन
2

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन

Miraj Visarjan: मिरजेत विसर्जन मिरवणुकीआधी उबाठा अन् शिंदे गटात कमानींवरून बॅनर वॉर
3

Miraj Visarjan: मिरजेत विसर्जन मिरवणुकीआधी उबाठा अन् शिंदे गटात कमानींवरून बॅनर वॉर

Akshaya Naik: कलेतून केली बाप्पाची सेवा; मालवणीतील मुलांसाठी अक्षया नाईकचे क्लाऊनिंग प्रयोग
4

Akshaya Naik: कलेतून केली बाप्पाची सेवा; मालवणीतील मुलांसाठी अक्षया नाईकचे क्लाऊनिंग प्रयोग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.