४५ मिनिटांचा प्रवास फक्त ८ मिनिटांत; कोकणचा प्रवास होणार वेगवान
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम तब्बल १२ वर्षापासून जास्त काळ रखडल आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम २०२५ मध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याच्या आश्वासनांची खैरात अनेकदा करण्यात आले. मात्र, ५ महिने पूर्ण होत आली असली डिसेंबर २५ पर्यंत काम पूर्णत्वास जाईल याची शाश्वती नाही असे असले तरी २०२५ वर्षात मुंबई गोवा महामार्गाबाबत सर्वात मोठी अपटेड समोर आली आहे. ती म्हणजे मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगद्यांमधून वाहतूक सुरू करण्यात आली असल्याने प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. कशेडी घाट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अतिशय अवघड आणि धोकेदायक असा घाट आहे.
दोन्ही स्वतंत्र बोगद्यांमुळे वाहनचालकांना दिलासा
कशेडी घाटात येण्या-जाण्यासाठी सुमारे दोन किलोमीटरचे दोन स्वतंत्र चोगदे बांधण्यात आले आहेत. या मुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कशेडी घाटातील ४५ मिनिटांचा प्रवास या बोगद्यामुळे ८ मिनिटांत होणार आहे. यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास सुपरफास्ट होणार यात कोणतीच शंका नसल्याचेच समोर येत आहे.
३.४४ किलोमीटर लांबीचा बोगदा
दरम्यान मुंबई गोवा महामार्ग चौपदरी करणं दरम्यान काम करताना कशेडी घाटात रस्त्याचे चौपदरीकरण शक्य नसल्याने भारतीय पद्धतीचा भुयारी मार्ग खणून रस्ता करण्यात आला आहे. घाटात ३.४४ किलोमीटर लांबीच्चा बोगदा तयार करण्याचे काम रिलायन्स इन्फास्ट्रक्चर कंपनीने घेतले होते या बोगदा चे काम करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तीन पदरी करण्यात आला असून, दोन भुयारी बुमर तंत्रज्ञान च्या साह्याने करण्यात आले त्यातील करारानुसार ७.२ किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा पक्का करण्यात आला.
भुयारी मार्गांना जोडणाऱ्या कनेक्टिव्हिटीचा मार्ग तयार
या दोन्ही भुयारी मार्गात आपत्कालात उपयुक्त असलेले वायुविजन सुविधेचे एक भुयारही यात समाविष्ट आहे. पोलादपूर बाजूच्या पहिल्या अर्जा किलोमीटरच्या टप्प्यात दोन्ही भुयारी मार्गाना जोडणाऱ्या कनेक्टिव्हिटीचा भुयारी मार्ग तयार करण्यात आला त्याच प्रमाणे आतील भागात परत यू टर्न घेणाऱ्या वाहनांसह अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची सुविधा या कनेक्टिव्हिटी भुयारी मागनि करण्यात येणार आहे सुरवातीला डोंगरात खेडच्या बाजूने है काम सुरू करण्यात आले होते. कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गासाठी एक अत्याधुनिक भुयार खोदकामाचे यंत्र म्हणजेव बूमर वापरण्यात आले होते, याद्वारे तीन ते चार मीटर लांबीचे कातळ फोडले जात होते. २० मीटर रुंदी आणि ६.५ मीटर उंची अशा पद्धतीने भुयारी मार्गाचे खोदकाम करण्यास बूमर यंत्राचा उपयोग करण्यात आला आहे.