फोटो सौजन्य- प्रतिनिधी
वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित गेल्या वर्षी मिळालेल्या ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शनाला’ अभूतपूर्व प्रतिसादानंतर नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात दि. ५ ते ९ जानेवारी २०२५ रोजी चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन २०२५ ” कृषी महोत्सव बहादूरशेखनाका येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या स्टॉल नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव आणि स्वप्ना यादव यांनी दिली.
यावर्षी महोत्सवाचे दोन दिवस वाढविण्यात आले
वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे गेल्या वर्षी चिपळूणमध्ये कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. या महोत्सवाचे कृषी क्षेत्रातील तज्ञांनी भरभरून कौतुक केले होते. यावर्षी महोत्सवाचे दोन दिवस वाढविण्यात आले आहेत. या महोत्सवाच्या स्टॉल नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले होते. या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तसेच महिला बचत गटांच्या मोफत स्टॉल्सला देखील उदंड प्रतिसाद मिळाला आहे. तर आता मोजकेच स्टॉल्स उपलब्ध असून इच्छुकांनी त्वरित स्टॉल नोंदणीसाठी
9422661197, 9637605757, 7588330011, 9890393823, 7722045048 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव आणि मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी केले आहे.
या सुविधा असणार
या प्रदर्शनात कॅफेटेरिया, २४ तास जनरेटर सुविधा, भव्य पार्किंग व्यवस्था, टॉयलेट्स फायर स्टेशन सुविधा असणार आहे व्यवस्थापन कार्यालय असून कोणाचीही गैरसोय होणार नाही, याकडे विशेष लक्ष असणार आहे.
या संस्था सहभागी होणार
खते, जैविक खते आणि शेतीच्या नवीन पद्धती,कृषी अवजारे, यंत्रे, कृषीविषयक अत्याधुनिक साहित्य वि-बियाणे, कृषी रसायने (जंतुनाशके, किटकनाशके, पीकवाढीसाठी उपयुक्त रसायने इत्यादी), फळ व फुले उत्पादन संबंधीत विविध पद्धती व आधुनिक तंत्रज्ञान अत्याधुनिक फवारणी यंत्रे (ठिबक सिंचन, फवारा पंपसेट, स्टार्टर इ.), अत्याधुनिक हायटेक कृषी विभाग (ग्रीन हाऊस, मशरूम उत्पादन, अॅक्चॉकल्चर, वायोटेक्नॉलॉजी, टिश्यू कल्चर वैगरे) ग्रीनहाऊस उभारणी, शेततळे व्यवस्थापन अशा संस्था सहभागी होणार आहेत.
प्रदर्शनात १०० पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग
या प्रदर्शनात १०० पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग असून चर्चासत्रासाठी विशेष कक्ष, पशु पक्षी व प्राणी प्रदर्शन तर जनावरांचा गोठा विशेष आकर्षण असणार आहे. प्री फॅब्रिकेटेड स्टॉल्स, वैविध्यपूर्ण अवजारे, मान्यवरांच्या भेटी व मार्गदर्शन असणार आहे. पिलरलेस दोन शामियान परदेशी भाजीपाला या प्रदर्शनात असून विविध मनोरंजनाचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. एकंदरीत भव्य प्रदर्शन असून शेतकऱ्यांना या प्रदर्शनाचा मोठा लाभ होणार आहे.