Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किल्ले सिंधुदुर्गवर तूफान राडा; पर्यटकांकडून गाईडला मारहाण, स्थानिक लोकं आले अन्…

किल्ले शिव राजेश्वर मंदिरात पर्यटक ग्रुपला माहिती देत असताना सात ते आठ युवकांचा एक ग्रुप धागडधिंगाणा घालत होता. शिवराजेश्वर मंदिरातच हा प्रकार होत असल्याने पर्यटक गाईड यांनी त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 24, 2026 | 03:05 PM
किल्ले सिंधुदुर्गवर तूफान राडा; पर्यटकांकडून गाईडला मारहाण, स्थानिक लोकं आले अन्...

किल्ले सिंधुदुर्गवर तूफान राडा; पर्यटकांकडून गाईडला मारहाण, स्थानिक लोकं आले अन्...

Follow Us
Close
Follow Us:

मालवण : किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात धिंगाणा घालणाऱ्या युवकांना समज दिल्याच्या रागातून गाईडला मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी स्थानिकांनी पोलिसांना माहिती देत पोलीस किल्ले सिंधुदुर्ग येथे पोहचले आणि त्यांनी पर्यटकांना ताब्यात घेऊन मालवण पोलिस ठाण्यात आणले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले शिव राजेश्वर मंदिरात पर्यटक ग्रुपला माहिती देत असताना सात ते आठ युवकांचा एक ग्रुप धागडधिंगाणा घालत होता. शिवराजेश्वर मंदिरातच हा प्रकार होत असल्याने पर्यटक गाईड यांनी त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पर्यटकांनी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असताना पर्यटकांकडून गाईडला मारहाण करण्यात आली. स्थानिक युवकाला मारहाण होत असल्याचे पाहून किल्ले रहिवासी आणि इतर पर्यटकांनी गाईडला बाजूला करत पर्यटकांची चांगलीच हजेरी घेतली. यात काही पर्यटकांनी पळ काढला होता. तर दोघे पर्यटक स्थानिकांच्या ताब्यात मिळाले होते.

हुल्लडबाज पर्यटकांना रोखणे आवश्यक किल्ले

सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिर या ऐतिहासीक वास्तुमध्ये हुल्लडबाजी करणे योग्य नसल्याची जाण पर्यटकांना नसल्याने आजचा प्रकार घडल्यामुळे किल्ल्यावरील रहिवासी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य राखणे आवश्यक असल्याने किल्ले सिंधुदुर्गवर कायमस्वरूपी पोलीस नियुक्त करणे आवश्यक आहे. स्थानिकांनी समजावूनही पर्यटकांनी त्यांच्याशी हुज्जत घालून तुम्ही आम्हाला सांगणारे कोण? असा प्रश्न करत स्थानिकांनाच मारहाण केल्याने अशा आक्रमक पर्यटकांना स्थानिकांनी चांगल्याच शब्दात समज दिली आहे.

दरम्यान, पोलीसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांनी तत्काळ पोलिस अधिकारी यांना किल्ले सिंधुदुर्ग येथे पाठवून हुल्लडबाज पर्यटकांना मालवण पोलीस ठाण्यात आणले होते.

रात्री उशीरापर्यंत कारवाई

स्थानिक पर्यटन गाईड याला मारहाण करणारे काही पर्यटक पळून गेले होते, तर त्यापैकी दोन पर्यटक सापडून आले होते. यामुळे सर्व पर्यटकांना एकत्रित करण्यासाठी पोलीसांनी शोध मोहिम राबविली होती. तसेच किल्ले सिंधुदुर्ग येथून दोघा पर्यटकांना बोटीच्या सहाय्याने पोलिसांनी मालवणमध्ये आणले होते. किल्ले पर्यटन व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांनी याप्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याने संबंधितांवर रात्री उशीरापर्यंत कारवाई करण्यात येत होती.

Web Title: Tourists beaten to guide incident in malwan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Tourist Spot

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.