
Ravindra Dhangekar News: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री प्रकरणावरून सुरू झालेला वाद चिघळत चालला आहे. या प्रकरणात भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ अडचणीत आले असून, शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्यावर आरोपांची सरबत्ती कायम ठेवली आहे. काल रात्री पुन्हा त्यांनी जैन बोर्डाचे व्यवहार रद्द व्हावेत अशी मागणी केली आहे. तसेच, व्यवहार रद्द होईपर्यंत आपण बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री वादाचे प्रकरण १ तारखेपूर्वी मिटवू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार, शनिवारी ते जैन बोर्डिंग हाऊसमध्ये विश्वस्तांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र, या भेटीदरम्यान मोहोळ यांना जैन बांधवांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला.
घटनेच्या वेळी उपस्थित बांधवांनी घोषणाबाजी करत मोहोळ यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली. इतकेच नव्हे तर, एका महिलेनं त्यांना आक्रमकपणे जाब विचारण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचं पाहून मोहोळ यांनी तिथून निघून जाणेच श्रेयस्कर मानले. या घटनेनंतर रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावरून मोहोळ यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विट करत या प्रकरणात मोहोळ यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला असून, प्रकरण अधिकच गडद होत चालल्याचे संकेत दिले आहेत.
रवींद्र धंगेकर यांनी ट्विट करत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.”तमाम पुणेकरांना मी एका गोष्टीची माहिती देऊ इच्छितो, आज आपल्या सर्वांच्या वतीने मी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा व प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी, यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती करत आहे. तसेच २७ ऑक्टोबर २०२५ पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत मी तमाम पुणेकरांसह जैन बोर्डींग येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसत आहे.
आजपर्यंतच्या गेल्या अठरा दिवसांच्या संपूर्ण संघर्षात माझ्यासह अनेक लोकांनी, अनेक वेळा या गोष्टीचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष पुरावे दिले की, व्यवहारातील सर्वच व्यक्ती व संस्था या श्री.मुरलीधर मोहोळ यांच्या संबंधित आहेत. आज मी या पत्र्यामध्ये देखील आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम देत आहेत.”
कोलेस्टरॉलमुळे ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या होतील मोकळ्या! रोज न विसरता आहारात करा ‘या’ पदार्थांचा
“जैन बोर्डिंग चा व्यवहार रद्द होण्याबरोबरच समाजातील मंदिरे व देवस्थानच्या जागा हडप करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी या प्रकरणाची निपक्ष:पाती चौकशी होणे गरजेचे आहे. ही मी निपक्ष:पाती चौकशी तेव्हा शक्य आहे जेव्हा सदर प्रकरणातील मुरलीधर मोहोळ हे आपल्या पदाचा राजीनामा देतील. कारण त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या प्रभावाखालीच हा इतका मोठा गैरव्यवहार घडला आहे. त्यामुळे ही चौकशी होत असताना देखील त्यांनी मंत्रीपदावर राहणे योग्य नाही. त्यामुळे मी आज मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.
आज माननीय पंतप्रधानांसह ,देशाचे गृह तथा सहकारमंत्री, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना देखील आपण या पत्राच्या प्रती पाठवत आहोत.त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने हा व्यवहार आपल्या विशेष अधिकारातून रद्द करावा व या प्रकरणाची कठोर चौकशी होईपर्यंत श्री. मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा ,अशी मागणी मी करत आहे.”
तमाम पुणेकरांना मी एका गोष्टीची माहिती देऊ इच्छितो, आज आपल्या सर्वांच्या वतीने मी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा व प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी, यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती करत आहे.
तसेच २७ ऑक्टोबर २०२५ पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत… pic.twitter.com/VtUIDSPPrr — Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 25, 2025