iPhone 18 Pro Updates: आगामी आयफोन मॉडेलमध्ये मिळणार सॅटेलाइट 5G सर्विस, Apple चा गेम चेंजर अपडेट लीक
गेल्या महिन्यात बहुप्रतिक्षित आयफोन 17 सिरीज लाँच करण्यात आली आहे. यानंतर आता कंपनी त्यांच्या आगामी आयफोन 18 सिरीजच्या लाँचिंगची तयारी करत आहे. आयफोन 18 सिरीजबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. त्यामुळे या सिरीजसाठी सर्वजण प्रचंड उत्सुक आहेत. आयफोन 18 सिरीज 2026 मध्ये लाँच केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सिरीजमधील काही मॉडेल्सचे फीचर्स आता लीक झाले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, अॅपलच्या आगामी आयफोन 18 सिरीजच्या प्रो मॉडेलमध्ये सॅटेलाइट 5G सर्विस दिली जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून कंपनी त्यांच्या आयफोनमध्ये सॅटेलाइट मेसेजिंगचे ऑप्शन देत आहे आणि आता यामध्ये सॅटेलाइट 5G सर्विस देखील जोडली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी कंपनी एलन मस्कच्या स्टारलिंकसेबत हातमिळवणी करू शकते.
आयफोन 14 नंतरच्या मॉडेल्समध्ये सॅटेलाइटद्वारे इमरजेंसी मेसेजसाठी अॅपल आणि ग्लोबलस्टार सॅटेलाइट यांनी पार्टनरशिप केली आहे. या पार्टनरशिपअंतर्गत आयफोनमध्ये मोबाईल नेटवर्क नसेल तरी देखील इमरजेंसी कॉन्टेक्ट्सना मेसेज करणं शक्य आहे. मात्र आता या दोन्ही कंपन्या वेगळ्या होण्याची शक्यता आहे आणि टेक जायंट अॅपल स्टारलिंकसह हातमिळवणी करून त्यांच्या आगामी आयफोनसाठी सॅटेलाइट 5G सर्विस सुरु करण्याची शक्यता आहे. सध्या स्टारलिंक आणि अॅपल यांच्यामध्ये याबाबत कोणताही करार करण्यात आला नाही. मात्र दोन्ही कंपन्या सॅटेलाइट फीचरसाठी एकाच रेडियो स्पॅक्ट्रमचा वापर करते. अशा परिस्थितीत दोन्ही कंपन्यांनी एकत्र येऊन काम केलं तर त्यांच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे.
नावाप्रमाणेच याचे फीचर देखील आहे. या सर्विसअंतर्गत फोनमध्ये सॅटेलाइटद्वारे 5G कनेक्टिविटी सपोर्ट दिला जाणार आहे. यासाठी युजर्सना जमिनीवर उपलब्ध असलेल्या मोबाईल नेटवर्कवर अवलंबून राहावे लागणार नाही. याचा फायदा असा असणार आहे की, यूजर्सना हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिविटी मिळणार आहे.
एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, आयफोन 18 सिरीजमधील मॉडेल्ससाठी युजर्सना जास्त किंमत मोजावी लागू शकते. कारण नवीन मॉडेल्स A20 चिप आणि इतर अनेक हार्डवेअर अपग्रेड्ससह लाँच होतील. यामुळे Apple चा खर्च वाढेल आणि हे ग्राहकांवर सोपवले जाईल.
2026 मध्ये आयफोन 18 लाँच केल्यानंतर कंपनी 2027 मध्ये आयफोन 19 नाही तर आयफोन 20 लाँच करणार आहे. कारण 2027 मध्ये कंपनीला 20 वर्ष पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने कंपनी आयफोन 19 सिरीज स्किप करून आयफोन 20 सिरीज लाँच करणार आहे. त्यामुळे हा क्षण अविस्मरणीय होणार आहे.






