Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेडलाईनची ‘डेडलाईन’ फिक्स! नक्षलमुक्तीचे काऊंटडाउन, जनतेमध्ये भय कायम

नक्षलमुक्तीचे काऊंटडाउन सुरू असले तरी गडचिरोली मध्ये भीती पूर्णपणे कमी झालेली नाही. गेल्या दोन दशकांत पोलिस मोहिमा आणि शासनाच्या योजनांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 28, 2026 | 08:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

Gadchiroli News : नक्षलमुक्तीचे काऊंटडाउन सुरू झाले असले तरी जनतेमध्ये भीतीचे वातावरण अद्याप पूर्णपणे निवळलेले नाही. गडचिरोली जिल्ह्यात एकेकाळी १० उपविभागांमध्ये माओवादी चळवळीने दहशतीचे साम्राज्य निर्माण केले होते. खंडणी, जनअदालती, हत्या, पोलिसांवर हल्ले आणि विकासकामांमध्ये अडथळे अशा घटनांमुळे सामान्य नागरिक भयभीत होते. मात्र गेल्या दोन दशकांत गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या सातत्यपूर्ण नक्षलविरोधी मोहिमा, स्थानिकांचा वाढता पाठिंबा आणि शासनाच्या विविध योजनांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाला आहे.

SSC आणि HSC चा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर! आता प्रतीक्षा झाली पुरे; ‘या’ टप्प्यांनी पाहू शकता Result

राज्य शासनाने २००५ मध्ये आत्मसमर्पण योजना जाहीर केल्यानंतर अनेक जहाल माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात प्रवेश केला. आतापर्यंत सुमारे ७९४ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, त्यांना पुनर्वसनाच्या माध्यमातून नवे जीवन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि सामाजिक पुनर्स्थापना यामुळे अनेकांनी पुन्हा सामान्य आयुष्य स्वीकारले आहे. विशेष म्हणजे २०२२ ते २०२६ या कालावधीत ११ वरिष्ठ माओवाद्यांसह १२३ जणांनी शस्त्रे खाली ठेवली आहेत.

दरम्यान, पोलिसांच्या कारवायांचाही वेग वाढविण्यात आला आहे. २०२१ ते २०२६ या कालावधीत विविध चकमकींमध्ये ९९ माओवादी ठार झाले, तर १४० जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवायांमुळे माओवादी संघटनांचे नेतृत्व, भरती प्रक्रिया, आर्थिक पुरवठा आणि शस्त्रसाठा यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे जंगलातील त्यांची पकड मोठ्या प्रमाणात कमकुवत झाली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील 7 शाळांचा सन्मान! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत झाली निवड

तरीही, नक्षलमुक्तीचा अंतिम टप्पा गाठण्यासाठी अजून काही आव्हाने कायम आहेत. दुर्गम भागातील नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण असून, पूर्ण विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. विकासकामे, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी यांचा अधिक विस्तार करून शासनाला स्थानिकांचा विश्वास संपादन करावा लागणार आहे. एकूणच, गडचिरोलीत नक्षलमुक्तीचे ‘काऊंटडाउन’ सुरू झाले असले तरी ही प्रक्रिया पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी सुरक्षा, विकास आणि विश्वास या तिन्ही घटकांचा समतोल साधणे अत्यावश्यक ठरणार आहे.

Web Title: Red lines deadline set the countdown to naxal free status begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 08:31 PM

Topics:  

  • Gadchiroli
  • Gadchiroli Naxalites

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.