Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara District Bank Election: जावळीत ठरावासाठी भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला! ज्ञानदेव रांजणे विरुद्ध शशिकांत शिंदे यांच्यात जोर

भाजप नेते वसंतराव मानकुमरे यांच्या हातगेघर,कावडी सोसायटी ठरावावरून चांगलेच रणकंदन सुरू असलेले पाहायला मिळत आहे. शशिकांत शिंदे समर्थक सोसायटी चेअरमन प्रवीण गुजर यांनी आपला ठराव घेण्यासाठी चंग बांधल्याने मानकुमरे यांचा येथे ठराव होण्यास विरोध वाढला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 18, 2026 | 04:31 PM
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे बिगूल वाजले; पहिल्याच दिवशी सहा अर्ज

सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे बिगूल वाजले; पहिल्याच दिवशी सहा अर्ज

Follow Us
Follow Us:

Satara District Bank Election: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघातून ठराव घेण्यास सुरुवात झाली असून, जावळी तालुक्यात आपल्या गावातील सोसायटीचा आपल्याच नावे ठराव घेण्यासाठी तालुक्यातील भाजप नेते मंडळींची प्रतिष्ठा चांगलीच पणाला लागलेली पाहायला मिळत आहे.

नेते मंडळींच्या नावाचा ठराव देण्यास अनेक गावात विरोध दिसून येत आहे. जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे हे एकीकडून ठरावासाठी लॉबिंग करत आहेत तर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे विरोधीबाजूने अधिकाधिक ठराव घेण्यासाठी लॉबिंग करत असल्याने निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे.

Sonam Wangchuk यांच्या प्रकृतीबाबत पत्नीचा गंभीर आरोप; सफदरजंग रुग्णालयाकडून वैद्यकीय अहवाल देण्यास नकार

जिल्हा बँकेत सोसायटी मतदारसंघातून निवडून जाण्यासाठी सोसायट्यांचे ठराव घेतले जात आहेत. आत्तापर्यंत तालुक्यात आठ सोसायटींचे ठराव प्रक्रिया पूर्ण झाली आहे.यामध्ये दस्तुरखुद्द प्रदेशअध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे स्वीयसह्ययक मयूर देशमुख यांचे गाव असलेल्या सोनगाव सोसायटीचा ठराव बाजार समितीचे चेअरमन जयदीप शिंदे यांनी आपल्या नावाचा घेत अखेर बाजी मारली आहे.पंचायत समिती सभापती सौरभ शिंदे यांनी कुडाळ सोसायटीचा तर जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी केळघर सोसायटीतून आपला ठराव घेतला आहे . आतापर्यंत झालेले आठवी ठराव भाजपच्या बाजूने झालेले पाहायला मिळत आहेत.

मात्र अशा परिस्थितीत भाजप नेते वसंतराव मानकुमरे यांच्या हातगेघर,कावडी सोसायटी ठरावावरून चांगलेच रणकंदन सुरू असलेले पाहायला मिळत आहे. शशिकांत शिंदे समर्थक सोसायटी चेअरमन प्रवीण गुजर यांनी आपला ठराव घेण्यासाठी चंग बांधल्याने मानकुमरे यांचा येथे ठराव होण्यास विरोध वाढला आहे. त्यामुळे संचालकांना गोवा ट्रिपवरून फिरवून आणूनही मानकुमरे यांची येथे प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सोनम वांगचुक प्रकरणावर सुषमा अंधारे आक्रमक; ‘सरकार पुरस्कृत गुंड’ म्हणत भाजप आणि पोलिसांवर निशाणा

पंचायत समिती उपसभापती गोरख महाडिक हे राजकारणात नवखे आहेत. त्यांना अद्याप तितकासा राजकीय अनुभव नसतानाही ते रेटून काम करत आहेत. मात्र त्यांच्या घोटेघर,रांजणी सोसायटीचा ठराव त्यांना मिळवण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.कोरमअभावी येथील सभा रद्द ही नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे.

माजी उपसभापती व भाजप नेते हणमंत पार्टे, उपसभापती दत्ता गावडे यांच्या खर्शी बारामुरे सोसायटीचा ठराव देखील भाजप विरोधी गटाकडेच जाणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. विधानसभा लढवणाऱ्या अमित कदम यांना मेढा सेंटर सोसायटीचा ठराव मिळवण्यात मोठी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी रांजणे यांचे विचारांच्या संचालकांचे पारडे जड असलेले पाहायला मिळत आहे. एकंदरीतच तालुक्यातील नेते मंडळींना आपल्या नावाचा ठराव घेण्यात संचालकांकडून परखड विरोध होत असलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील सहकारातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.

या ठराव प्रक्रियेवर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे बारकाईने लक्ष आहे. त्यामुळे भाजपमध्ये येऊन पदे मिळवणाऱ्या नेतेमंडळींना ठराव घेताना कोणत्याही प्रकारच्या गमतीजमती करता येणार नाहीत. मोरघर,महिगाव सोसायटीचा ठराव हा आपल्याच गटाचा व्हायला हवा असा सज्जड इशारा मंत्री भोसले यांनी येथील पुढाऱ्यास दिला आहे.

 

Web Title: Regional news satara district central cooperative bank election jawali medha dnyandev ranjane shashikant shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Satara Politics

संबंधित बातम्या

Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचं राजकारण तापणार; रामराजे, शिवेंद्रसिंहराजे अन् मकरंद पाटलांची खलबते
1

Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचं राजकारण तापणार; रामराजे, शिवेंद्रसिंहराजे अन् मकरंद पाटलांची खलबते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.